(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करा - आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश | मराठी १ नंबर बातम्या

तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करा - आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई ( ९ जुलै २०१९ ) : अमरावती जिल्ह्यातील तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे, निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मंत्रालयात आरोग्य सेवेसंबंधित विविध प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार यशोमती ठाकूर व आरोग्य विभागाचे, राज्य कामगार विमा योजनाचे वरिष्ठ अधिकारी तसेच अस्थायी परिचरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, सद्य:स्थितीत तिवसा येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे. या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यासाठी तसेच येथे २० खाटांचे ट्रॉमाकेअर मंजूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान, राज्य कामगार विमा योजनेतील बंधपत्रित/ अस्थायी परिचरिकांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. या संदर्भात प्रस्ताव सादर करण्यात यावा असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget