(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अतिरिक्त पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत सकारात्मक - गिरीष महाजन | मराठी १ नंबर बातम्या

अतिरिक्त पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत सकारात्मक - गिरीष महाजन
मुंबई ( १ जुलै २०१९ ) : अतिरिक्त पाणी असलेल्या खोऱ्याचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यादृष्टीने नदीजोडसारखी योजना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व नगर तालुक्यातील साखळाई उपसा सिंचन योजनेच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री राहूल जगताप, अजित पवार आणि शरद सोनवणे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महाजन म्हणाले, साखळाई उपसा सिंचन योजनेमध्ये कुकडी प्रकल्पाचे 3 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर तलावात सोडण्याचे व तेथून ते उपसा सिंचन योजना राबविण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र, सन 2000 मध्ये पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेशन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी तयार केलेल्या पाणी उपलब्धता अहवालात या योजनेसाठी पाणी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच कृष्णा पाणीवाटप लवादाच्या निर्णयानुसार राज्याला अनुज्ञेय असलेल्या पाणी वापराच्या नियोजनात या योजनेचा अंतर्भाव नसल्याने योजनेबाबतची पुढील कार्यवाही झाली नाही.

कुकडी प्रकल्पातील मूळ नियोजनातील बॅकवॉटरमधील गावांनाही अद्याप सिंचनाचे पाणी उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे. तसेच दुसरा कृष्णा पाणी वाटप लवादाकडे राज्याला अतिरिक्त पाणी वाटप होण्याची मागणी असून ती मान्य झाल्यास जादाचे पाणी असलेल्या डिंभे प्रकल्पाचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळवणे शक्य होईल. त्यानुसार डिंभे- माणिकडोह बोगदा करण्याबाबत विचार सुरू असून त्यानंतर या उपसा सिंचन योजनेसाठी 3 टीएमसी पाणी उपलब्ध करुन देणे शक्य होईल. नवीन प्रकल्पांचे सिंचनाचे पाणी मोठ्या बंद पाईपलाईनने देण्याचे शासनाचे धोरण आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेल्या कालव्यांची गळती बंद करण्यासाठी दुरुस्तीवरही निधी देण्यात येईल, असेही ते म्हणाले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget