मुंबई ( १६ जुलै २०१९ ) : डोंगरी येथील अपघातग्रस्त इमारतीची मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज पाहणी केली. या अपघाताला जे कोणी जबाबदार असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, जखमींना जलद गतीने मदत पोहोचवण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले असून मुंबईतील धोकादायक इमारती आणि तेथील नागरिकांचे पुनर्वसन या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळून अनेक नागरिक त्याखाली गाडले गेले आहेत. या घटनेनंतर मुंबईचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली व जखमींना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
यावेळी देसाई म्हणाले की, मुंबईतील जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर झालेला आहे. दरवर्षी पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. प्रशासनाने अशा इमारतीमधील नागरिकांचे तत्काळ पुनर्वसन करण्याची गरज आहे. दरम्यान, आजच्या इमारत दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा