मुंबई ( ९ जुलै २०१९ ) : मुंबई, दि. 9 : लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योजकांच्या संघटनांनी रोजगार निर्मितीला चालना द्यावी, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
पश्चिम विभागातील १८ लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योजकांच्या संघटनेची स्थापन करण्यासाठी आय़ोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून देसाई उपस्थित होते. यावेळी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे उपस्थित होते.
यावेळी देसाई म्हणाले, राज्यात रोजगार वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नुकताच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पाता ३०० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योजकांच्या संघटनांनी देखील रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. शासन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास तत्पर आहे.
लघु उद्योगांची संख्या वाढल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अशा उद्योगांना सवलती देण्याचे शासनाचे धोरण आहे. नवीन औद्योगिक धोरणात देखील त्यानुसार बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे येत्या काळात लहान उद्योगांनी लहान न रहाता मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगावे, असे आवाहन देसाई यांनी केले. याशिवाय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योजकांच्या संघटनांनी पुढाकार घेऊन आपल्या कंपन्यांचे नोंदणी शेअर बाजारात करावी, असा सल्लाही देसाई यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा