(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पाच वर्षांत सकारात्मकतेने कार्य करीत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | मराठी १ नंबर बातम्या

पाच वर्षांत सकारात्मकतेने कार्य करीत महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ( २ जुलै २०१९ ) : महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे सकारात्मकतेने कार्य करुन राज्याला विविध आघाड्यांवर देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केले.

सर्वसमावेशकता आणि सकारात्मकता, प्रामाणिकता, पारदर्शीपणा या माध्यमातून वारीत सहभागी झाल्याची भावना मनात ठेवून राज्याचे विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विदर्भ-मराठवाडा अनुशेष, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना झालेली मदत, जलयुक्त शिवार सारखे महत्वाचे प्रकल्प, त्यासाठी मिळालेली जनतेची साथ, सिंचन प्रकल्प, वीजपंप वाटप अशा विविध बाबींचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख करुन हे कार्य करत असताना समाधान लाभल्याचे सांगितले.

त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या कारकीर्दीचा आढावा घेताना अध्यक्षांनी या पदाची महती अधिक वाढविण्याचे कार्य केले असल्याचे सांगून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तसेच उपाध्यक्षांचेही त्यांनी आभार मानले. या ठरावावर उपाध्यक्ष विजय औटी, मंत्री सर्वश्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते जयंत पाटील, सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, जीवा पांडु गावीत यांनीही अध्यक्षांबद्दल आपले विचार व्यक्त केले. त्यावर मा. अध्यक्षांनी लोकशाहीच्या मंदिराच्या पायरीच्या दगडाला मंदिराच्या कळसापर्यंत आणून ठेवल्याबद्दल सर्व सहकार्यांचे आभार मानले.

अंतिम आठवडा प्रस्तावातील मुद्यांवर मंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, जयकुमार रावल, गिरीष महाजन, आशिष शेलार, डॉ. परिणय फुके यांनीही आपले विचार व्यक्त केले.

अधिवेशनातील कामकाज

या अधिवेशनात एकूण 12 दिवस कामकाज झाले असून त्याचा अवधी 100 तास 16 मिनिटे आहे. एकूण 26 विधेयके संमत झाली. एकूण 8 हजार 24 तारांकित प्रश्न प्राप्त झाली होती. त्यापैकी 711 स्वीकृत करण्यात आली तर 53 प्रश्नांची चर्चा झाली. एकूण 80 लक्षवेधींपैकी 43 लक्षवेधींवर चर्चा झाली. अशासकीय विधेयके, 293 अन्वये चर्चा, अंतिम आठवडा प्रस्ताव आदींवरही चर्चा झाली.

(अ) दोन्ही सभागृहात संमत विधेयके

(१) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 4 - महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था (सुधारणा) विधेयक, 2019 (विधि व न्याय विभाग) धर्मादाय विश्वस्त व्यवस्थेव्दारे चालविण्यात येणाऱ्या दवाखान्यांमध्ये मोफत किंवा सवलतीच्या दराने उपचार करावयाच्या गरीब रुग्णाकरिता नेत्र शस्त्रक्रिया (Intra-ocular surgery) करिता खाटा राखुन ठेवण्याबाबतची तरतुद करण्याकरिता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा करणे. (विधि व न्याय विभाग) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 26.02.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 27/28.02.2019, 18/19.06.2019) (विधानसभेत संमत दि. 19.06.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.20/21.06.2019) विधान परिषदेत संमत दि. 21.06.2019).

(२) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 21. - महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे) आरक्षण ( सुधारणा व विधीग्राह्यीकरण) विधेयक, 2019. (सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 13 चे रूपांतर) (सामान्य प्रशासन विभाग), (2019-20 या शैक्षणिक वर्षापासून, वैद्यकीय आणि दंत पदवी व पदव्युत्तर पाठ्यक्रमांच्या बाबतीत आणि तसेच, राष्ट्रीय पात्रता-नि-प्रवेश चाचणी किंवा इतर कोणतीही राष्ट्रीय प्रवेश चाचणी उत्तीर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या, पदवी पाठ्यक्रमासह इतर शैक्षणिक पाठ्यक्रमांच्या बाबतीत, एसईबीसी वर्गाला आरक्षणाद्वारे प्रवेश देण्याबाबत कलम 16 च्या पोट-कलम (2) च्या स्पष्टीकरणामध्ये, स्वयंस्पष्ट तरतुदी करण्याकरिता) (पुर:स्थापित दि. 19.06.2019) (विधासभेत संमत दि. 20.06.2019) (विधानपरिषदेत संमत दि. 21.06.2019 )

(३) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 6- सोमय्या विद्याविहार विद्यापीठ, मुंबई विधेयक, 2019, सोमय्या विद्याविहार विद्यापीठ, मुंबई, याची स्थापना, त्याचे विधिसंस्थापन व विनियमन करणे (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 27.02.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 28.02.2019, 18/19.06.2019) (विधानसभेत संमत दि. 19.06.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.20/21.06.2019). विधान परिषदेत संमत दि. 21.06.2019).

(४) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 7- डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे विधेयक, 2019, डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे याची स्थापना, त्याचे विधिसंस्थापन व विनियमन करणे (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 27.02.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 28.02.2019, 18/19.06.2019). (विधानसभेत संमत दि. 19.06.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 20/21.06.2019) (विधान परिषदेत संमत दि. 21.06.2019).

(५) सन 2019 चे विधानपरिषद विधेयक क्र.1 - महाराष्ट्र कृषि विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, 2019 (महासंचालक, भारतीय कृषि संधोधन परिषद यांचा कार्यभार विचारात घेता, कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूची निवड प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जात असल्याबद्दलची सुनिश्चिती करण्यासाठी, कुलगुरूची नेमणूक करण्याकरिता कुलपतीला योग्य नावे सूचविण्यासाठी असलेल्या समितीवर महासंचालक, भारतीय कृषि संधोधन परिषदकिंवा सेवानिवृत्त महासंचालक किंवा अध्यक्ष, कृषि वैज्ञानिक निवड मंडळ किंवा संचालक, भारतीय कृषि संशोधन संस्था यांच्यामधील एक सदस्य असेल, अशी तरतूद करणे.) (कृषि विभाग) (विधानपरिषदेत पुर:स्थापित दि. 25.02.2019) (विधानपरिषदेत संमत दि. 26.02.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 26/27/28.02.2019, 24/25.06.2019) (विधान परिषदेत संमत दि. 25.06.2019).

(६) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 15 .-महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2019 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 4 चे रूपांतर) (सोलापूर विद्यापीठ सोलापुरचा, अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठ सोलापुर असा नामविस्तार करण्याबाबत.) (पुर:स्थापित दि. 19.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 20/21/24.06.2019, विधानसभेत संमत दि. 24.06.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.25/26.06.2019) (विधान परिषदेत संमत दि. 26.06.2019).

(७) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 24- महाराष्ट्र कृषि विद्यापीठ आणि महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2019 (सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 14 चे रूपांतर) (कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग) (डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या मत्स्य विज्ञानाशी संबंधित पदविका, प्रमाणपत्रे आणि पदव्या पुर्वलक्षी प्रभावाने विधीग्राह्य करणे आणि मत्स्यविद्या शाखेतील पदविका, पदवी, पदव्युत्तर व आचार्य इत्यादी पदव्या देण्याचे अधिकार अपवाद म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठास देण्याबाबतची तरतूद करणे) (पुर:स्थापित दि. 20.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 21/24.06.2019.) (विधानसभेत संमत दि. 24.06.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.25/26.06.2019) (विधान परिषदेत संमत दि. 26.06.2019).

(८) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र.25- श्री बालाजी विद्यापीठ, पुणे विधेयक, 2019, (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) श्री बालाजी विद्यापीठ, पुणे याची स्थापना, त्याचे विधिसंस्थापन व विनियमन करणे. (पुर:स्थापित दि. 20.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 21/24/25.06.2019 विधानसभेत संमत दि. 25.06.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.26.06.2019) (विधान परिषदेत संमत दि. 26.06.2019).

(९) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 28. रामदेवबाबा विद्यापीठ, नागपूर विधेयक, 2019 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) रामदेवबाबा विद्यापीठ, नागपूर याची स्थापना, त्याचे विधिसंस्थापन व विनियमन करणे).(पुर:स्थापित दि. 24.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 25.06.2019विधानसभेत संमत दि. 25.06.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.26.06.2019) (विधान परिषदेत संमत दि. 26.06.2019).

(१०) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र.20 - महाराष्ट्र करविषयक कायदे (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2019 (सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 6 चे रूपांतर) (वित्त विभाग) (व्यापार सुलभता धोरणांतर्गत ऐच्छिक नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द करण्यासाठी महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, 2002 सुधारणा करण्याकरिता तसेच, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, अजिविका व नोकऱ्या यावरील कर अधिनियम 1975 मध्ये सुधारणा करण्याबाबत).(विधान सभेत पुर:स्थापित दि. 24.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 25/26.06.2019). (विधानसभेत संमत दि. 26.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.27.06.2019). (विधानपरिषदेत संमत दि. 27.02.2019)

(११) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 34 महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2019 (पुर:स्थापित दि. विचारार्थ आणि संमत दि. 27.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.28.06.2019)(विधान परिषदेत संमत दि. 28.06.2019).

(१२) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 33- महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक, 2019 (सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 5 चे रूपांतर) (वित्त विभाग) (मुल्यवर्धित कर तसेच अन्य करांच्या प्रदाना संदर्भात अभय योजना) (पुर:स्थापित दि. 25.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 27.06.2019.) (विधानसभेत संमत दि. 27.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.28.06.2019) (विधान परिषदेत संमत दि. 28.06.2019)

(१३) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 39महाराष्ट्र विनियोजन (द्वितीय पुरवणी) विधेयक, 2019 (पुर:स्थापित दि. विचारार्थ आणि संमत दि. 27.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.28.06.2019) (विधान परिषदेत संमत दि. 01.07.2019).

(१४) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 40. - महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे) आरक्षण (सुधारणा) विधेयक, 2019. (पुर:स्थापित दि. 01.07.2019) (विधासभेत संमत दि. 01.07.2019) (विधानपरिषदेत संमत दि. 01.07.2019 )

(१५) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 2 -महाराष्ट्र शेतजमीन (जमिनधारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा) विधेयक, 2019. एकात्मिक नगर विकास प्रकल्पांना शेतजमीन खरेदीच्या कमाल धारणा मर्यादेतून सुट देण्याकरीता महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करणे (महसुल व वन विभाग) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 25.02.2019) (विधानसभेत संमत दि. 26.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.27/28.02.2019, 18/19/20/21/24/25/26/27/ 28.06.2019, 01.07.2019 ) (विधानपरिषदेत संमत दि. 01.07.2019 )

(१६) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 3 - महाराष्ट्र जमीन महसूल व विशेष आकारणी यामध्ये वाढ करणे (सुधारणा) विधेयक, 2019 (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण तसेच शहर व औघोगिक विकास महामंडळ यांच्या कब्जातील किंवा त्यांनी भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनींना महाराष्ट्र जमीन महसूल व विशेष आकारणी यामध्ये वाढ करण्याबाबत अधिनियम, 1974 यांची प्रयोजने लागू न करण्याबाबत) (महसूल विभाग) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 25.02.2019) (विधानसभेत संमत दि. 26.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.27/28.02.2019, 18/19/20/21/24/25/26/27/28.06.2019, 01.07.2019) (विधानपरिषदेत संमत दि. 01.07.2019)

(१७) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 14 - महाराष्ट्र मुद्रांक (सुधारण व विधिग्राह्यीकरण) (पुढे चालू ठेवणे) विधेयक, 2019 (सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 7 चे रूपांतर) (महसूल व वन विभाग) (शासनाच्या विविध प्राधिकरणांकडून वाटप करण्यात आलेल्या निवासी-अनिवासी गाळे आणि सदरनिकांसह सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सदनिका आणि भाडेपट्ट्यांचे हस्तांतर दस्त यासाठी आकारण्यात आलेलया मुद्रांक शुल्काच्या शास्तीच्या रक्कमेत सूट देणारी मुद्रांक शुल्क अभय योजना राबविण्याकरिता) (पुर:स्थापित दि. 19.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 20/21/24/25/6.06.2019). (विधानसभेत संमत दि. 26.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.27/28.06.2019, 01.07.2019)(विधानपरिषदेत संमत दि. 01.07.2019 )

(१८) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र.16 - स्पायसर ॲडवेनटिस्ट विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2019. (सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 12 चे रूपांतर) (उच्च व तंत्रशिक्षण विभाग) (विद्यार्थ्याच्या हिताचे रक्षण करण्याबाबतची तरतूद व विद्यापीठ आणि त्याचे सर्व अधिकारी भविष्यात अधिनियमाच्या तरतुदीचे अनुपालन करतील यांची सुनिश्चती करण्यासाठी व अधिनियमाच्या तरतुदीचे उल्लंघन हा अपराध असेल व अश्या अपराधासाठी कारावासाची व द्रव्य दंडाची शिक्षा असेल अशी तरतुद करण्याबाबत.) (पुर:स्थापित दि. 19.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 20/21/24/25/26.06.2019). (विधानसभेत संमत दि. 26.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 28.06.2019, 01.07.2019) (विधानपरिषदेत संमत दि. 01.07.2019 ).

(१९) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 22 - मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2019. (सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 11 चे रूपांतर) (नगर विकास विभाग), (46.45 चौ.मी. (500 चौ.फु.) किंवा त्याहून कमी चटई क्षेत्र असलेल्या निवासी इमारती किंवा निवासी गाळ्यांना मालमत्ता करातून सुट देण्याकरिता) (पुर:स्थापित दि. 19.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 24/25/26.06.2019) (विधानसभेत संमत दि. 26.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.27/28.06.2019, 01.07.2019) (विधानपरिषदेत संमत दि. 01.07.2019 ).
(२०) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 32. एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद विधेयक, 2019 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) एमजीएम विद्यापीठ, औरंगाबाद याची स्थापना, त्याचे विधिसंस्थापन व विनियमन करणे) (पुर:स्थापित दि. 25.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 26.06.2019.) (विधानसभेत संमत दि. 26.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 28.06.2019, 01.07.2019) (विधानपरिषदेत संमत दि. 01.07.2019 ).

(२१) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 17 - महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2019 (सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 9 चे रूपांतर) (सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग) (गृहनिर्माण सहकारी संस्थाच्या निवडणुका वेळेत पार पडतील याची सुनिश्चिती करण्यासाठी, अशा निवडणुका विनाविलंब घेण्याकरिता नियमांद्वारे कार्यपद्धती विहित करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे घेण्याकरिता तरतूद करणे.) (पुर:स्थापित दि. 20.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 21/24/25/27.06.2019) ( विधानसभेत संमत दि. 27.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.28.06.2019, 01.07.2019) (विधानपरिषदेत संमत दि. 01.07.2019 ).

(२२) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र.30. - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2019. (नगरविकास विभाग) (महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी तसेच तिचे फ्रान्चायजी यांनी धारण केलेल्या वीज वितरण व्यवस्थेतील बांधकामांबाबत मालमत्ता करातून सूट देण्याबाबत) (पुर:स्थापित दि. 25.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 26/27/28.06.2019.) (विधानसभेत संमत दि. 28.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि..01.07.2019) (विधानपरिषदेत संमत दि. 01.07.2019 ).

(२३) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 31.-पंढरपूर मंदिर (सुधारणा) विधेयक, 2019 (विधि व न्याय विभाग) (पंढरपूर मंदिर विश्वस्तव्यवस्थेचा वार्षिक अहवाल दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवण्याबाबत तरतुदी) (पुर:स्थापित दि. 25.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 26/27/ 28.06.2019.) (विधानसभेत संमत दि. 28.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 01.07.2019) (विधानपरिषदेत संमत दि. 01.07.2019 ).

(२४) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र.- 35- भूमिसंपादन, पुनर्वसाहत करताना उचित भरपाईचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2019. (औद्योगीक विकासासाठी भूसंपादन करण्यासाठी सुलभता यावी याकरिता तरतूद) (वन विभाग) (पुर:स्थापित दि. 27.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 28.06.2019.) (विधानसभेत संमत दि. 28.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.01.07.2019)(विधानपरिषदेत संमत दि. 01.07.2019 ).

(२५) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र.36- महाराष्ट्र औद्योगिक विकास (सुधारणा) विधेयक, 2019. (औद्योगिक विकासासाठी भुसंपादन करण्यास सुलभता यावी याकरिता तरतुद) (उद्योग विभाग)) (पुर:स्थापित दि. 27.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 28.06.2019.) (विधानसभेत संमत दि. 28.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 01.07.2019) (विधानपरिषदेत संमत दि. 01.07.2019 ).

(२६) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र.37 - महाराष्ट्र करविषयक कायदे (दुसरी सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2019 (मा. वित्त मंत्रयांच्या अर्थसंक्लपीय भाषणाने करविषयक कायद्यांमध्ये सुधारणा) (वित्त विभाग) ) (पुर:स्थापित दि. 27.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 28.06.2019.)( विधानसभेत संमत दि. 28.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 01.07.2019) (विधानपरिषदेत संमत दि. 01.07.2019 ).

-------

(ब) विधान सभेत प्रलंबित विधेयके

(१) सन 2017 चे विधानसभा विधेयक क्र. 64 -महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (दुसरी सुधारणा) विधेयक, 2017 राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घ्यावयाच्या निवडणुकांकरिता नियम करण्यासाठीचा कालावधी वाढविणे व प्रशासकास किंवा प्रशासकीय मंडळास निवडणुका घेण्यासाठी कालावधी वाढवून देणे यांकरिता तरतूद करणे. (अध्यादेश क्रमांक 20/2017 चे रुपांतर) (पणन विभाग) विधानसभेत विचारार्थ दि.20/21/22/23/26/27/28.03.2018,दि.19/20.07.2018,28/29/30.11.2018, 27/28.02.2019, 26/27/28.06.2019, 01/02.07.2019)

(२) सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र. 29 - महाराष्ट्र (लोकसेवकांची) विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकारजमा करण्याबाबत विधेयक, 2018.(गृह विभाग) (फौजदारीपात्र गैरवर्तनाचा अपराध केलेल्या लोकसेवकांची मालमत्ता सरकारजमा करण्याकरिता ; आणि त्याच्याशी संबंधित किंवा तदानुषंगिक बाबीकरिता तरतूद करणे (पुर:स्थापित दि.27.03.2018 - विधानसभेत विचारार्थ दि.28.03.2018/16/17/18/19/ 20.07.2018, दि. 30.11.2018, 27/28.02.2019, 26/27/28.06.2019, 01/02.07.2019).

(३) सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र. 34-हैद्राबाद अतियात चौकशी (सुधारणा) विधेयक, 2018 (खिदमतमाश जमिनींचा कालानुरुप वापर करणे शक्य व्हावे यासाठी हैदराबाद अतियात चौकशी अधिनियम, 1952 च्या कलम 6 मध्ये सुधारणा करणेबाबत) (महसूल विभाग) (अध्यादेश क्रमांक 11/2018 चे रुपांतर). (पुर:स्थापित दि.04.07.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. )

(४) सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र. 36 - महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2018 (पणन विभाग), (महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियम) अधिनियम, 1963 याच्या कलम 13(1) (ब) मध्ये बाजारक्षेत्रात व्यापारी व अडते संवर्गातून मतदार म्हणून अर्हता धारण करण्यासाठी लागणारा 2 वर्षाचा लायसन धारण करण्याच्या कालावधी 1 महिन्यांहून कमी नसेल इतका आणि किमान 10,000 इतक्या रक्कमेचा व्यवहार असा बदल करण्यासाठी सुधारणा करण्याकरिता). (अध्यादेश क्रमांक 12/2018 चे रुपांतर) (पुर:स्थापित दि. 04.07.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 05/06/09/10/11/12/13/16/17/18.07.2018) (विधानसभेत संमत दि. 18.07.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 19/20.07.2018, 20/22.11.2018) (विधानसभेत पुन्हा संमत करण्याकरीता दि. ).

(५) सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र. 77 - महाराष्ट्र सहकारी संस्था (चौथी सुधारणा) विधेयक, 2018.(सहकार विभाग) (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1961 च्या कलम 24अ च्या तरतुदीनुसार सहकार शिक्षण व प्रशिक्षण देण्याकरिता प्रशिक्षण निधीत अंशदान देण्याच्या संदर्भात त्या त्या सहकारी संस्थेचे स्वरुप लक्षात घेऊन अधिसूचित केलेल्या राज्य संघीय संस्था किंवा राज्य शिखर प्रशिक्षण संस्था यांना अंशदान देण्याकरिता तरतुदी) (विधानसभेत पुर:स्थापित दि.29.11.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 30.11.2018, 27/28.02.2019, 24/25/26/27/28.06.2019, 01/02.07.2019).

(६) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्र. 13 - महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, २०१९ (सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ८ चे रूपांतर) (नगर विकास विभाग), (प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीमध्ये समाजकल्याणाच्या कार्यात गुंतलेल्या असतील अशा प्राधिकाऱ्याने नामनिर्देशित केलेल्या सहापेक्षा अधिक नसतील इतक्या समावेश करण्याकरिता कलम ७(१) मध्ये सुधारणा करणेकरिता) (पुर:स्थापित दि. 19.06.2019)(विधानसभेत विचारार्थ दि. 20/27/28.06.2019, 01/02.07.2019).

(७) सन २०१९ चे विधानसभा विधेयक क्र. 18.-महाराष्ट्र सहकारी संस्था (दुसरी सुधारणा) विधेयक, २०१९. (सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 10 चे रूपांतर) (सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग), (परिसमापक म्हणून व्यक्तीचे मंडळ नियुक्त करणे व प्रशासकांची समिती नियुक्त करणे, तसेच कलम ८१ अन्वये आलेले अहवाल सबळ पुरावा म्हणून समजले जावे यासाठी तरतूद करणे आणि विशेष निबंधकाने दिलेल्या आदेशांच्या किंवा निर्णयांच्या विरूध्द राज्य शासनाकडे अपील तसेच पुनर्रिक्षण अर्ज करण्याची तरतुद करणे) (पुर:स्थापित दि. 19.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 25/27/28.06.2019, 01/02.07.2019).

(८) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र. 41- महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारण सदस्य अनर्हता (सुधारणा) अधिनियम, 2019पुर:स्थापित दि. 02.07.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 02.07.2019,).

(९) सन 2019 चे विधानसभा विधेयक क्र.42- महाराष्ट्र मालमत्ता हक्क प्रमाणीकरण विधेयक, 2019. (राज्यातील मालमत्तेच्या हक्कांसदर्भात संबंधीतांना मालकीहक्क प्रमाणपत्र देण्याबाबत तरतुद ) (महसुल विभाग)पुर:स्थापित दि. 02.07.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 02.07.2019).

(क) विधान परिषदेत प्रलंबित विधेयके

(१) सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र. 61 -महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) (सुधारणा) विधेयक, 2018 (व्यथित पालकांच्या गटाला शाळा व्यवस्थापनाने अथवा कार्यकारी समितीने घेतलेल्या फी-वाढीच्या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्याची संधी देण्याची तरतूद करण्याबाबत व अन्य अनुषंगिक सुधारणा) (शालेय शिक्षण विभाग) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 19.07.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 20.07.2018, 26.11.2018) (विधानसभेत संमत दि. 26.11.2018) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 27/28/29/30.11.2018)(विधानसभेत दुसऱ्यांदा नियम १४१ (१) अन्वये विचारार्थ दिनांक २८.०२.२०१९, 18/19.06.2019.) (विधानसभेत दुसऱ्यांदा संमत दि. 19.06.2019) (विधानपरिषदेत दुसऱ्यांदा विचारार्थ दि. 20/21/24.06.2019 ).

(२) सन 2019 चा महाराष्ट्र विधेयक क्र. 5-महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) (सुधारणा) विधेयक, 2019 (ग्राम विकास विभाग) 26 मार्च 2015 ते 31 मार्च 2016 दरम्यान राखीव जागांवर निवडून आलेल्या व्यक्तींना त्यांच्या निवडणुकीच्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या आत त्यांचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता मुदत वाढ देण्याकरिता व अध्यादेशाच्या दिनांकापासून तीन महिन्यात प्रमाणपत्र सादर करण्याची तरतुद करण्याकरिता(सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक २ चे रूपांतर) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 26.02.2019)(विधानसभेत विचारार्थ दि. 27/28.02.2019, 24/25/27/28.06.2019, 01.07.2019) (विधानसभेत संमत दि. 01.07.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि.02.07.2019).

संयुक्त समीतीकडे पाठविलेली विधेयके

(1) सन 2019 चा महाराष्ट्र विधेयक क्र. 29-महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक, 2019 (ग्राम विकास विभाग) (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यांकरिता त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती यांमधील जागा राखून ठेवणे) (पुर:स्थापित दि. 24.06.2019) (विधानसभेत विचारार्थ दि. 25/27/28.06.2019.) (विधानसभेत संयुक्त समीतीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मंजुर दि. 28.06.2019)

(इ) शासकीय ठराव

(१) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दवाढीच्या प्रारूप अधिसूचनेस मान्यतेसाठी शासकीय ठराव (नगर विकास विभाग) (मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या हद्दवाढीच्या प्रस्तावास मान्यता)

(फ) मागे घेण्यात आलेली विधेयके

(१) सन 2019 चा महाराष्ट्र विधेयक क्र. 1 - महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, 2019. (महसुल व वन विभाग)(मुद्रांक शुल्कावरील दंडाच्या प्रदाना संदर्भात अभय योजना) (सन २०१९ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १ चे रूपांतर)(विधानसभेत पुर:स्थापित दि. 25.02.2019) (विधानसभेत संमत दि. 26.02.2019) (विधानपरिषदेत विचारार्थ दि. 27/28.02.2019 ). (मागे घेण्यात आले 17.06.2019)

(२) सन 2018 चे विधानसभा विधेयक क्र. 70 - महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक 2018. (सहकार वस्त्रोद्योग व पणन विभाग) (गृहनिर्माण सहकारी संस्थाच्या निवडणुका वेळेत पार पडतील याची सुनिश्चिती करण्यासाठी, अशा निवडणुका विनाविलंब घेण्याकरिता नियमांद्वारे कार्यपद्धती विहित करण्याचे अधिकार राज्य शासनाकडे घेण्याकरिता तरतूद करणे.) (अध्यादेश क्रमांक 25/2018 चे रुपांतर) (विधानसभेत पुर:स्थापित दि. 22.11.2018) (विधानसभेत विचारार्थ दि. 26/27/28/29/30.11.2018, 27/28.02.2019) (मागे घेण्यात आले दि. 19.06.2019).
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget