मुंबई, दि. 29 : कारागृहात बंदी असणारे गोपाल शिवराम तांबे हे 12 डिसेंबर 2017 रोजी मृत्यू पावले. या घटनेची दंडाधिकारी चौकशी बुधवार दि. 31 जुलै 2019 रोजी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक शाखा, तिसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-400001 या ठिकाणी होणार आहे. ज्यांना ह्या चौकशी संबंधी आपले म्हणणे मांडावयाचे असेल त्यांनी आपले लेखी निवेदन नायब तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई शहर यांच्या समोर चौकशीच्या वेळी सादर करावेत, असे आवाहन कार्यकारी दंडाधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा