(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महालक्ष्मी एक्सप्रेस बचाव कार्याबद्दल अभिनंदन | मराठी १ नंबर बातम्या

महालक्ष्मी एक्सप्रेस बचाव कार्याबद्दल अभिनंदन

मुंबई ( ३० जुलै २०१९ ) : मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थ‍ितीत वांगणीजवळ महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांचे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन केले.

आपत्तींमध्ये मदतकार्य करताना योग्य समन्वय साधून उत्तम बचावकार्याचा आदर्श या घटनेतून निर्माण झाला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधितांची प्रशंसा केली. महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ, लष्कर, नौदल, हवाईदल, स्थानिक प्रशासन, रेल्वे प्रशासन, पोलीस अशा सर्व यंत्रणेच्या मदतीने आणि पालकमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींनी तत्परतेने आणि सर्व अडचणींवर मात करीत यशस्वी प्रयत्न केले. मंत्रिमंडळातील सदस्यांनीही यंत्रणेचे विशेष अभिनंदन केले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget