(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची तर जखमींना 50 हजारांची तातडीची मदत | मराठी १ नंबर बातम्या

डोंगरी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाखांची तर जखमींना 50 हजारांची तातडीची मदत

मुंबई ( १७ जुलै २०१९ ) : डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात येईल तसेच जखमींच्‍या उपचारांचा सर्व खर्च शासनाच्यावतीने करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुंबईतील डोंगरी परिसरात काल (दि. 16) सकाळी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची सर्वंकष चौकशी करण्‍याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत. दुर्घटना स्थळी बचाव व मदत कार्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्यासोबत योग्य समन्वय राखण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दिले होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget