मुंबई ( १ जुलै २०१९ ) : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती आज विधानभवनात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी, राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, गृह (शहरे) राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दिपक केसरकर, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांचेसह विधीमंडळाचे सदस्य,अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही दिवंगत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

टिप्पणी पोस्ट करा