(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); फलोत्पादन योजनांसाठी निधीत वाढ करणार - जयदत्त क्षीरसागर | मराठी १ नंबर बातम्या

फलोत्पादन योजनांसाठी निधीत वाढ करणार - जयदत्त क्षीरसागर

पंढरपूर ( १० जुलै २०१९ ) : पारंपरिक शेती बरोबरच फलोत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळायला हवे. फलोत्पादनामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावतो. त्यामुळे फलोत्पादनाच्या योजनांसाठी निधीत वाढ केली जात आहे, असे फलोत्पादन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज येथे सांगितले.

क्षीरसागर यांच्या हस्ते भंडीशेगांव येथे आज फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथांचे आज उदघाटन आज झाले. आषाढी एकादशीला राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या वारकऱ्यांपर्यंत फलोत्पादन विभागाच्या विविध योजनांची माहिती पोहचविण्यासाठी या चित्ररथांचे आयोजन करण्यात आले आहे.


मागेल त्याला शेततळे योजनेला आता 95 हजार अनुदान दिले जाईल. यापूर्वी केवळ पन्नास हजार रुपये दिले जात होते. शेतरस्ते जोडण्यासाठी महत्त्वाची योजना आखण्यात आली आहे. एक किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आणखी अठ्ठावीस प्रकारच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री क्षिरसागर यांनी दिली.

राज्यातील बहुतांश भाग कोरडवाहू आहे. या भागात फलोत्पादन वाढावे यासाठी राज्य शासनाने विविध योजना आखल्या आहेत. फलोत्पादन खालील क्षेत्र वाढावे यासाठी मागेल त्याला शेततळे ही महत्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेसाठी आधिक निधीची तरतूद करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही क्षीरसागर म्हणाले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget