(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); दिघी - पुणे महामार्गाच्या निजामपूर बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर - मंत्री एकनाथ शिंदे | मराठी १ नंबर बातम्या

दिघी - पुणे महामार्गाच्या निजामपूर बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर - मंत्री एकनाथ शिंदे

मुंबई ( ९ जुलै २०१९ ) : दिघी पुणे महामार्गाचे निजामपूर गावाबाहेरून बाह्यवळणरस्त्याच्या भूसंपादनासाठी व आराखड्याच्या अनुषंगिक मंजूरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. याबाबत पाठपुरावा करून आरखडयास मंजुरी प्राप्त होताच तत्काळ पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

मंत्रालयात नियोजित दिघी पुणे महामार्गाचे निजामपूर गावाबाहेरून बाह्यवळणरस्ता मंजूर करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते. यावेळी आमदार भरतशेठ गोगावले तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शिंदे म्हणाले, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या २०१९-२०२० च्या वार्षिक आराखड्यास प्रारूप मसूद्यामध्ये निजामपूर बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनासाठी व अनुषंगिक मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget