विधानसभा/तारांकित प्रश्न
मुंबई ( १ जुलै २०१९ ) : मंडाळा कुर्ला स्क्रॅप परिसरातील भंगार कारखान्यावर टाकलेल्या छाप्यादरम्यान रसायनांचे सुमारे 1 हजार पिंप आढळून आले असून बेकायदेशीर पिंपांची साठवणूक आणि साबण कारखाना चालविल्याप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली.
मानखुर्द मंडाळा (मुंबई) परिसरात वाशी खाडीच्या नाल्यात बेकायदा रसायनमिश्रित तेल सोडण्यात येत असल्याच्या अनुषंगाने सदस्य अबू आजमी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
कदम पुढे म्हणाले, या ठिकाणी असलेल्या स्क्रॅप उद्योगाच्या जागेचा भाडेकराराची मुदत संपुष्टात आली आहे. त्यावर संबंधित व्यावसायिक न्यायालयात गेले असून न्यायालयाने या प्रकरणात 1 महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार मुदतीमध्ये निर्णय घेण्यात येईल. या जागेव्यतिरिक्त व्यावसायिकाने अनधिकृतरित्या ताब्यात घेतलेली जागा शासन वॉल कंपाऊंड टाकून ताब्यात घेईल. बेकायदेशीररित्या कांदळवनात भराव टाकल्याचेही या परिसरात आढळून आले असून मँग्रोव्हज सेलच्या माध्यमातून त्याविरुद्ध कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेत सदस्य नसीम खान यांनीही सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा