(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); छतावरील पावसाचे पाणी साठवणारी यंत्रणा शासकीय इमारतींवर अनिवार्य करणार - डॉ. परिणय फुके | मराठी १ नंबर बातम्या

छतावरील पावसाचे पाणी साठवणारी यंत्रणा शासकीय इमारतींवर अनिवार्य करणार - डॉ. परिणय फुके

मुंबई ( ३ जुलै २०१९ ) : पुढील काळात सर्व शासकीय इमारतींवर छतावरील पावसाचे पाणी साठवणारी यंत्रणा (रुफ वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम) अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.

आज मंत्रालयात राज्यमंत्री डॉ. फुके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक घेतली.

सध्या बांधकाम होत असलेल्या आणि गेल्या पाच वर्षांत बांधल्या गेलेल्या शासकीय इमारतींवर छतावरील पावसाचे पाणी साठवणारी यंत्रणा बसविणे अनिवार्य करण्यात येईल. राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मोबाईल ॲप, 48 तासात खड्डे बुजविण्यात यावेत यासाठी कंपनीला सूचना देण्यात येणार आहे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे अधिक वेगवान होण्यासाठी निविदा कालावधी 7 दिवसांचा करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. फुके यांनी दिली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget