मुंबई : मुंबई बंदराला लागून असलेल्या श्रमिकांच्या वस्त्यांना स्वातंत्र्या नंतर अजून पर्यंत पिण्याचे पाणी कनेक्शन मुंबई बंदर विश्वस्त ( BPT) देत नव्हते.
परंतु मागील १० वर्षापासून पाणी हक्क समिती आणि सोबत स्थानिक नगरसेवक, आमदार आणि खासदार यांच्या सहकार्याने कौला बंदर दारुखाना येथील ७ जल जोडणी कायदेशीररित्या महिलांनी मंजूर करवून घेतल्या व पाणी अधिकार मिळविला.
आता मिळालेल्या पाणी अधिकाराचा आंनद कौला बंदर दारुखाना येथील 7 नळ कमिटीतील महिलांनी उत्स्फुर्तपणे या नळाचे उदघाटन ( २८ जून २०१९ ) करुन साजरा केला. या आनंद उत्सवात महापालिकेचे अधिकारी आणि स्थानिक राजकीय पक्षांच्या नेत्यांना-कार्यकर्त्यांना देखील आमंत्रित केले होते. मात्र या सर्वांनी हजेरी टाळली.
यापूर्वी येथे पाणी माफिया गुंड तसेच राजकीय कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने महापालिकेचे पाणी अधिक चढत्या दराने विकत घ्यावे लागत होते. मात्र 2015 साली मुबंई महापालिकेने पाण्याची होणारी चोरी व पाणी अधिकाराची वाढती मागणी ध्यानात घेता बी पी टी आणि पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेऊन ६ करोड रुपयांची नविन जलजोडणी मंजूर करून काम पूर्ण केले.
आज या नविन जलवाहिनीच्या कामाचे राजकीय श्रेयासाठी अनेक जण प्रयत्न करत असल्याचे कौला बंदर दारुखाना येथिल बॅनरबाजी वरून दिसून येत आहे. संपूर्ण परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा होई पर्यंत पानी हक्क समिती सर्वांना पिण्याच्या पाण्याच्या अधिकार मिळावा यासाठी सातत्यपूर्ण आंदोलन व न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार आहे.
पाणी अधिकार नळाच्या उदघाटन प्रसंगी पाणी हक्क सामितीचे सीताराम शेलार यांनी पाणी अधिकारासाठी लढलेल्या महिलांचे कौतुक करतांना राजकीय पक्षांना पाणी हे कोणाची जहागीर होवू शकत नाही, तर तो लोकांचा मूलभूत अधिकार आहे, असे ठणकावून सांगितले. यावेळी पाणी अधिकारांसाठी लढणाऱ्या महिलांचे नेतृत्व करणाऱ्या शांती हरिजन, सुलताना शेख, शकीला, किरण चौहान यांचे ही कौतुक करण्यात आले.
दारुखाना, आणि मुंबईतील पाण्यापासून वंचित असलेल्या वस्त्यांमध्ये घरा घरात नळ जोडणी पोहचवण्यासाठी "पाणी हक्क समिती", पाणी अधिकारांसाठी सातत्यपूर्ण सक्रिय राहील, अशी ग्वाही सीताराम शेलार यांनी यावेळी दिली.
सदर कार्यक्रमास पाणी हक्क समितीचे मुंबैभरातील साथी उमरभाई शेख, प्रविण बोरकर,रुकसार खान, जगदीश पाटणकर,विशाल जाधव,सुनिल यादव, योगेश बोले आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा