(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी विशेष अभियान राबविणार - डॉ.सुरेश खाडे | मराठी १ नंबर बातम्या

सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांसाठी विशेष अभियान राबविणार - डॉ.सुरेश खाडे

मुंबई ( ३ जुलै २०१९ ) : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी विशेष अभियान राबवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी दिले.

सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात त्याचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सच्याद्वारे घेण्यात आला. त्यावेळी डॉ.खाडे बोलत होते.

डॉ.खाडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागामार्फत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. त्याचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांना विशेषत: ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी विशेष अभियान राबवा. शासकीय वसतीगृह व निवासी शाळा यांचाही विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करा. या वसतीगृहांची प्रवेश प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. तसेच प्रलंबित जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरात लवकर वितरीत करावे.

‘स्वाधार योजना’ या योजनेचाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेची ज्या जिल्ह्यात प्रलंबित कामे आहेत ती तत्काळ पूर्ण करावीत. तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेचा लाभ पात्र भूमिहीनांना मिळवून देण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही यावेळी डॉ.खाडे यांनी सांगितले.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर उपस्थित होते. तर जिल्ह्यातून प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जि.प. उपस्थित होते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget