(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); लेखा व कोषागारे संचालनालयाच्या परीक्षेची निवड यादी महाकोष संकेतस्थळावर उपलब्ध | मराठी १ नंबर बातम्या

लेखा व कोषागारे संचालनालयाच्या परीक्षेची निवड यादी महाकोष संकेतस्थळावर उपलब्ध

मुंबई ( २० जुलै २०१९ ) : महाराष्ट्र राज्याच्या संचालनालय, लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागातील ‘गट क’ संवर्गातील परीक्षेचा निकाल शासनाच्या महाकोष संकेतस्थळावर विभागनिहाय उपलब्ध करण्यात आला आहे. उत्तीर्ण उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसंदर्भात २२ जुलै ते २९ जुलै २०१९ या कालावधीत उपस्थितीबाबत लेखा व कोषागारे विभागामार्फत कळविण्यात येणार असल्याची माहिती लेखा व कोषागारे विभागाचे संचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या लेखा व कोषागारे संचालनालय व स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागातील ‘गट क’ संवर्गातील लेखा लिपीक, लेखा परीक्षा लिपीक व कनिष्ठ लेखापाल तसेच कनिष्ठ लेखा परीक्षक या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा निकाल २० जुलै पासून https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील employee corner अंतर्गत Recruitment Rules येथे विभागनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. उत्तीर्ण उमेदवारांना वैयक्तिकरित्या संपर्क साधून कागदपत्रांची पडताळणी करण्याकरिता उपस्थितीबाबत कळविण्यात येणार आहे.

याबाबतची सूचना २४ जुलै २०१९ पर्यंत प्राप्त न झाल्यास उमेदवारांनी आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे छायांकित प्रतींसह (दोन संच) विभागनिहाय नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर येथील सहसंचालक लेखा कोषागारे कार्यालय तसेच स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग कार्यालयात २९ जुलैपर्यंत उपस्थित रहावे, असेही लेखा व कोषागारे विभागाचे संचालक यांनी पत्रकात नमूद केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget