(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ओंकार नवलिहाळकर, विनीत मालपुरे यांची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड | मराठी १ नंबर बातम्या

ओंकार नवलिहाळकर, विनीत मालपुरे यांची राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड

नवी दिल्ली, 20 : कोल्हापूर जिल्ह्यातील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील विनीत मालपुरे या तरुणांची वर्ष 2016-17 च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणा-या राष्ट्रीय युवा पुरस्कारांसाठी देशभरातील 25 तरूणांची निवड करण्यात आली असून ओंकार नवलिहाळकर आणि विनीत मालपुरे यांचा यात समावेश आहे.

ओंकार नवलिहाळकर हे कोल्हापुरातील आपत्कालीन सेवा संस्थांच्या माध्यमातून समाजसेवी उपक्रमांमध्ये ब-याच वर्षांपासून कार्यरत आहेत. जीवन ज्योत आपत्कालीन सेवा संस्था, जीवन मुक्ती आपत्कालीन सेवा संस्थांसोबत कार्यरत त्यांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले आहे.

सलाम मुंबई फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर मधील शाळा तंबाखूमुक्त करण्यामध्ये ओंकार यांनी महत्त्वाचे योगदान दिले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून तंबाखू मुक्तीची शपथ
घेतली. ओंकार एका डोळ्याने दिव्यांग असून देखील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या झालेल्या प्रशिक्षणात संपूर्ण महाराष्ट्रातून ओंकारचा प्रथम क्रमांक आला. संसदवारी उपक्रमांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ओंकारने भेट घेतली होती.

विनित मालपुरे यांनी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून युवा विकासाचे उल्लेखनीय कार्य केले असून त्यांनी हे कार्य ग्रामीण भागापर्यंत पोहचविले आहे. युवा विकास कार्याच्या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रकुल युवा परिषदेत सहभाग घेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. मालपुरे यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना ‘राज्य युवा पुरस्काराने’ सन्मानित केले आहे. सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी विनीत यांचा ‘राष्ट्रीय गौरव सन्मान 2018’ ने गौरव करण्यात आला आहे.

येत्या 12 ऑगस्ट रोजी दिल्लीत राष्ट्रीय युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. 40 हजार रूपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget