(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); केंद्र शासनाच्या गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

केंद्र शासनाच्या गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी खेळाडूंना अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 18 : केंद्र शासनाच्या युवा आणि क्रीडा मंत्रालय यांच्यामार्फत गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शन योजना राबविण्यात येते. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे.

गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी अर्ज करणारा खेळाडू हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे. खेळाडूने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशिन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.

विविध स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त/गुणवंत खेळाडूस नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पेन्शन 30 वर्षापासून (किंवा सक्रिय क्रीडा पासून सेवानिवृत्तीची तारीख, जे नंतर असेल) मिळणाऱ्या खेळाडूवर देय असेल आणि त्याच्या/तिच्या आयुष्यादरम्यान कायम राहील, परंतु पेन्शन लागू करताना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून निवृत्त झालेले असणे आवश्यक आहे. दर चार वर्षानी आयोजित होणाऱ्या विश्वचषक/विश्व अजिंक्यपद स्पर्धाकरिता सदरची योजना लागू राहणार आहे.

अ.क्र.
स्पर्धेचे नाव
दरमहा मानधन
1
ऑलिम्पिक/पॅरा ऑलिम्पिक गेम्स प्राविण्यधारक
20,000/-
2
सुवर्ण पदक विश्वचषक/विश्व अजिंक्यपद स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार)
16,000/-
3
रौप्य व कास्य पदक विश्वचषक स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार)
14,000/-
4
सुवर्ण पदक-कॉमनवेल्थ गेम्सएशियन गेम्सपॅरा एशियन गेम्स
14,000/-
5
रौप्य व कास्य पदक-कॉमनवेल्थ गेम्सएशियन गेम्सपॅरा एशियन गेम्स
12,000/-

            याबाबत संबंधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असून विहित नमुन्यातील अर्जावर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव/संचालक क्रीडा व युवक सेवा यांची स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावयाचा आहे. याबाबत अधिक माहिती खालील लिंकवर उपलब्ध आहे. https://www.yas.nic.in/sports/scheme-sports-fund-pension-meritorious-sportspersons राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget