मुंबई ( २३ जुलै २०१९ ) : कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर हिंदी व मराठी सिनेमा/दूरदर्शन क्षेत्रातील कलाकार विरुध्द सैन्यदल संघ यांच्यात फुटबॉल सामना रंगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत फुटबॉल सामना रंगणार आहे.
फुटबॉल सामना 26 जुलै रोजी कूपरेज मैदान, महर्षी कर्वे रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक क्षेत्र, नरिमन पॉईंट, मुंबई येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. माजी सैनिक/विधवा तसेच कुटुंबियांना हा सामना पाहण्यासाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपगनर व ठाणे जिल्ह्यातील माजी सैनिक/ विधवा तसेच कुटुंबियांनी फुटबॉल सामना पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा