(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पावणे दोन लाख युवकांना कौशल्य व उद्योजकतेचे प्रशिक्षण | मराठी १ नंबर बातम्या

पावणे दोन लाख युवकांना कौशल्य व उद्योजकतेचे प्रशिक्षण

60 हजार हून अधिक युवकांना रोजगार/स्वयंरोजगार प्राप्त

मुंबई ( ३ ऑगस्ट २०१९) : राज्यातील सुमारे पावणे दोन लाख युवकांना कौशल्य व उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर 60 हजारहून अधिक युवकांना रोजगार/स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे.महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियानाअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात आले.

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी सांगितले, 2 सप्टेंबर 2015 पासून 'कुशल महाराष्ट्र- रोजगारयुक्त महाराष्ट्र' असे उद्दिष्ट ठरवून काम करण्यात येत आहे. राज्यातील 15 ते 45 वयोगटातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतात.कौशल्य विकासासंबंधी अधिक मनुष्यबळ मागणीची 11 क्षेत्र निश्चित करण्यात आली आहेत.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत मार्च 2020 पर्यंत दीड लाखांहून अधिक युवक/ युवतींना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून आतापर्यंत 10 हजारांहून अधिक युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा, युवक/युवतींना कौशल्य प्रशिक्षण, स्टार्ट अप यात्रा/ स्टार्ट अप सप्ताहाचे आयोजन,महिलांना सशक्त करणारी हिरकणी महाराष्ट्राची योजना,आयटीआयचे बळकटीकरण, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत ‍प्रशिक्षण आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी कर्ज असे काही महत्वाचे निर्णय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने घेतले आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget