(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल, रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू -ॲड. आशिष शेलार | मराठी १ नंबर बातम्या

अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल, रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू -ॲड. आशिष शेलार

मुंबई़ ( ६ ऑगस्ट २०१९) : अशासकीय खाजगी शाळांमधील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आज घोषित केले. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.

राज्यातील अशासकीय खाजगी शाळांतील पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना दिनांक 22 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. तसेच अनुदानित व महापालिका, नगरपालिका शाळांमधील शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र अशासकीय खाजगी शाळांतील अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रंथपाल व रात्र शाळेचे शिक्षकांचा निर्णय प्रलंबित होता.

राज्यात 1012 अर्धवेळ शिक्षक, 1431 अर्धवेळ ग्रंथपाल तसेच 165 रात्र शाळांमधे काम करणारे, 630 रात्र शाळा शिक्षक, 219 शिक्षकेतर कर्मचारी असून या सर्वांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी घेतला असून त्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget