(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पूरबाधितांसाठी मदत स्वीकृती केंद्रामध्येच मदत जमा करण्याचे आवाहन | मराठी १ नंबर बातम्या

पूरबाधितांसाठी मदत स्वीकृती केंद्रामध्येच मदत जमा करण्याचे आवाहन

सांगली ( १३ ऑगस्ट २०१९) : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमिवर प्रत्यक्ष पूरबाधितांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी ती मदत स्वीकृती केंद्रामध्येच जमा करावी. मदत स्वीकृती केंद्रामध्ये प्राप्त होणारी मदत ही संबंधित ग्रामपंचायतीमार्फत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत सर्व बाधितांपर्यंत पोहोच केली जाईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यामध्ये अनेक गांवे बाधित झालेली असून सदर गावांमधील बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी विस्थापित करण्यात आले होते. सद्यस्थितीत नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट होऊन परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पूरबाधितांना विविध दानशूर / सेवाभावी संस्था / नागरीक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक / वस्तू स्वरुपात मदत केली जात आहे. यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय येथे व तालुका

स्तरावर संबंधित तहसिल कार्यालयामध्ये पूरग्रस्तांसाठी मदत स्वीकृती कक्ष स्थापन करण्यात आलेले असून, त्या कक्षामार्फत विविध ठिकाणांहून प्राप्त होणारी मदत एकत्रित करुन ती पूरबाधितांपर्यंत पोहोचविण्याचे काम अखंडितपणे सुरु आहे.

पूरबाधितांना मदत देण्यासाठी पुढीलप्रमाणे संपर्क करावा - जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली - शिल्पा ओसवाल - 8007547333, तहसिल कार्यालय, मिरज - सुनील कानडे - 7709286873, तहसिल कार्यालय, वाळवा - शर्वरी पवार - 9422763562, तहसिल कार्यालय, शिराळा - सिद - 9421177627, तहसिल कार्यालय, पलूस - पाटील - 9404419378 दरम्यान श्री स्वामी नारायण मंदिक, आंबेगाव (खु.) पुणे यांच्याकडून 3 गाड्यांद्वारे गृहोपयोगी साहित्याचे 1000 किट प्राप्त झाले. त्यातील 400 किट महानगरपालिका, 300 किट पलूस तालुका आणि 300 किट मिरज तालुक्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. तहसील कार्यालय, उरण यांच्याकडून प्राप्त 257 पाणी बॉक्स, खाद्यतेल, बिस्कीटस्‌ तहसीलदार पलूस यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. सहकार महर्षि कापरी विविध कार्यकारी सेवा मर्यादित, कापरी, नगर यांच्याकडून प्राप्त गृहोपयोगी साहित्य, धान्य, अंथरूण आदि मिरज तहसीलकडे वर्ग करण्यात आले आहे. पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेकडून प्राप्त मास्क, खराटे, घमेली आदि साफसफाईचे साहित्य मिरज तहसीलकडे वर्ग करण्यात आले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget