(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वैधमापन शास्त्र अधिकाऱ्यांच्या पथकांकडून ६२ आस्थापनांची तपासणी | मराठी १ नंबर बातम्या

वैधमापन शास्त्र अधिकाऱ्यांच्या पथकांकडून ६२ आस्थापनांची तपासणी

जादा दराने विक्री व अन्य कारणास्तव १७ खटले दाखल

सांगली, दि. 13, (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यातील सध्याच्या पूर परिस्थितीचा गैरफायदा घेवून काही व्यापारी जीवनावश्यक वस्तुंची विक्री ज्यादा दराने करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमिवर वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या पथकांनी सांगली व सांगली शहर, उपनगरे, मिरज, कुपवाड, पलूस, इस्लामपूर येथे विविध ठिकाणी एकूण ६२ आस्थापनांची तपासणी केली. तपासणीत पॅकबंद दूध व पाणी छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री केल्याबद्दल एकूण १० खटले तर दूध व इतर खाद्य पदार्थांच्या पाकीटावर किंमत व अन्य आवश्यक माहिती न छापल्याच्या कारणास्तव ७ असे एकूण १७ खटले वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ व आवेष्टित वस्तू नियम २०११ अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक नियंत्रक एस. के. बागल, आर. एन. गायकवाड आणि एन. पी. उदमले यांच्या पथकांनी ही कारवाई केली.

दरम्यान, जीवनावश्यक वस्तुंची विक्री कमाल किरकोळ विक्रीच्या किंमतीपेक्षा ज्यादा दराने करू नये. तसेच, असे निदर्शनास आल्यास ग्राहक व नागरिक यांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहाय्यक नियंत्रक, वैधमापन
शास्त्र, सांगली यांनी केले आहे. जीवनावश्यक वस्तुंची विक्री जादा दराने होत असल्यास जिल्हा सहाय्यक नियंत्रक कार्यालय, सांगली 02332600053 aclmsangli@yahoo.in नरेंद्रसिंग मोहनसिंह भ्रमणध्वनी क्रमांक
7972196004, नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई 02222622022 dclmms_complaint@yahoo.in या ठिकाणी तक्रार नोंदवावी.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget