मुंबई ( १० ऑगस्ट २०१९) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे.
3 ऑगस्टपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी विशेषत: सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या ठिकाणच्या बाधित लोकांचे स्थलांतर अन्य ठिकाणी करण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी इच्छुक देणगीदार / मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती / संस्था / संघटना यांचेकडून खाद्यपदार्थ, कपडे तसेच तत्सम साहित्य, प्रथमोपचार साहित्य, औषधे व इतर आवश्यक साहित्य स्वीकारण्याकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यात खालील ठिकाणी नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
1 जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत, 10 वा मजला, शासकीय वसाहत, बांद्रा (पूर्व), मुंबई-400051 दूरध्वनी - 022-26556799
2 उपविभागीय अधिकारी, मुंबई पूर्व उपनगर निळकंठ बिझनेस पार्क, ए विंग, तळ मजला, किरोळ रोड, विद्याविहार (प.), मुंबई-400086 दूरध्वनी 022-25111126
3 तहसिलदार, अंधेरी डी.एन.रोड, भवन्स कॉलेज जवळ, अधेरी (प.), मुंबई-400058 दूरध्वनी 022-26231368
4 तहसिलदार, बोरीवली डॉ.न.रा.करोडे मार्ग, नाटकवाला लेन, एस.व्ही.रोड, बोरीवली (प.), मुंबई-400092 दूरध्वनी 022-28075034
5 तहसिलदार, कुर्ला टोपीवाला कॉलेज इमारत, 1 ला मजला, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (प.), मुंबई-400080 दूरध्वनी 022-25602386
पूरग्रस्त लोकांना आवश्यक असणाऱ्या साहित्याची यादी वरील मदत कक्षात उपलब्ध आहेत. तरी पूरग्रस्तांसाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा