(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष -जिल्हाधिकारी दौलत देसाई | मराठी १ नंबर बातम्या

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष -जिल्हाधिकारी दौलत देसाई

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

कोल्हापूर ( १३ ऑगस्ट २०१९) : जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हास्तरीय पूरग्रस्त मदत सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी या कक्षाकडे पूरग्रस्तांसाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त व्यक्तींना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनातंर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पूरग्रस्त मदत सनियंत्रण कक्ष सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर येथे सुरू करण्यात आला असून या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2655416 व्हॉट्सॲप क्रमांक 9130059542 तर मोबाईल क्रमांक 9403145611 / 9422015712/ 9422014691/ 9421687612/ 9422014176 तर ई-मेल floodreliefkolhapur@gmail.com असा आहे. दानशूर व्यक्ती आणि संस्थांना पूरग्रस्तांसाठी मदत करावयाची असल्यास त्यांनी जिल्हास्तरीय पूरग्रस्त मदत सनियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. या कक्षामार्फत पूरग्रस्त गावांची माहिती घेऊन त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्याचे वितरण करण्याबाबत सनियंत्रण करण्यात येईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget