(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुंबईत ५ सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा | मराठी १ नंबर बातम्या

मुंबईत ५ सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा

मुंबई ( २८ ऑगस्ट २०१९) : प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिकांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे सन २०१८-१९ चे आदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर २०१९ रोजी मुंबईत आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित पुरस्कार प्रदान कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने समाजसेवा करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या शिक्षकांना दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

सन २०१८-१९ च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर १०७ शिक्षकांची निवड केलेली असून त्यामध्ये ३७ प्राथमिक शिक्षक, ३९ माध्यमिक शिक्षक,१८ आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणारे प्राथमिक शिक्षक, ८ सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षका, २ विशेष शिक्षक (कला/क्रीडा ) व १ अपंग शिक्षक/अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक व १ गाईड शिक्षक व १ स्काऊट शिक्षक यांचा समावेश आहे. या राज्य शिक्षक पुरस्काराची रक्कम दहा हजार रुपये असून राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दि.४ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम एक लक्ष रुपये अदा करण्यात येते.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget