(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला 50 कोटीची शासन हमी | मराठी १ नंबर बातम्या

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला 50 कोटीची शासन हमी

यवतमाळ ( २९ ऑगस्ट २०१९) : आदिवासी समाजासाठी विविध स्वयंरोजगार व उत्पन्न निर्मितीच्या योजनांसाठी केंद्र शासनाकडून सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला 50 कोटींची शासन हमी देण्यात आली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाकडून कर्ज स्वरुपात निधी मिळण्यासाठी 50 कोटीची शासन हमी देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

पुढे डॉ. अशोक उईके म्हणाले, आदिवासी बेरोजगार युवकांकरीता स्वयंरोजगाराच्या विविध योजना राबविण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्याकडून मुदतकर्ज स्वरुपात शबरी महामंडळास वेळोवेळी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक या महामंडळास राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्याकरीता राज्य शासनाची ठोक हमी रु.50 कोटी सन 2019-20 ते सन 2023-24 पर्यंत देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget