(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); जीवनावश्यक वस्तूंची विक्री जादा दराने होत असल्यास तक्रार द्या | मराठी १ नंबर बातम्या

जीवनावश्यक वस्तूंची विक्री जादा दराने होत असल्यास तक्रार द्या

सांगली ( १३ ऑगस्ट २०१९) : व्यापाऱ्यांनी सर्व जीवनावश्यक आवेष्टीत वस्तूंची विक्री कमाल किरकोळ किंमतीनेच करावी. ग्राहकांनी जीवनावश्यक वस्तूंची विक्री जादा दराने होत असल्यास त्याबाबतची तक्रार द्यावी. संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन वैध मापनशास्त्र सांगली कार्यालयाचे सहायक नियंत्रक यांनी केले आहे.

सांगली जिल्ह्यातील सध्या पुराची परिस्थिती पाहता गैर फायदा घेण्याच्या दृष्टीने काही व्यापारी जीवनावश्यक वस्तूंची विक्री जादा दराने करीत आहेत. त्यामुळे त्या संदर्भात बऱ्याच तक्रारी प्रसारमाध्यमातून व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. त्यामुळे नियंत्रक वैधमापन शास्त्र महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातील निरीक्षक तसेच सातारा जिल्ह्याचे सहायक नियंत्रक आर. एन. गायकवाड व ३ निरीक्षक, सोलापूर जिल्ह्याचे सहायक नियंत्रक एन. पी. उदमले व ३ निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे.

दिनांक ११ ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यात निरीक्षकांनी विविध ४१ ठिकाणी तपासणी करून ९ खटले दाखल केले आहेत. कमाल किरकोळ किंमतीपेक्षा जादा दराने दूध विक्री केल्याबाबत ५ खटले तसेच कमाल किरकोळ किंमतीपेक्षा जादा दराने पाणी विक्री केल्याबद्दल १ खटला, दुधाच्या पॅकेजींग कमोडिटी बाबत २ खटले व इतर १ खटला नोंदविण्यात आला आहे.

जीवनावश्यक वस्तूंची विक्री जादा दराने होत असल्यास त्याबाबतची तक्रार करण्यासाठी आर. एन गायकवाड भ्रमणध्वनी क्रमांक 9404260938, 9518979476, एस. के. बागल मो.क्र. 9404612810, 8888217052, नरेंद्रसिंह मोहनसिंह मो.क्र. 7972196004 व एन. पी. उदमले मो. क्र. 9527312091 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget