हेलिकॉप्टर व बोटीव्दारे अन्न पाकीटे व पाणी पुरवठा
सांगली ( ९ ऑगस्ट २०१९) : सांगली जिल्ह्यातील पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी 76 बोटी उपलब्ध असून यामध्ये एनडीआरएफ पथकाकडील 42, पुणे चिंचवड महानगरपालिका पथकाकडील 2, सोलापूरकडून 12, कोस्टल गार्डकडील 1, महाबळेश्वरकडील 6, राजारामबापू सहकारी साखर कारखाना वाळवा यांच्याकडील 1, ग्रामपंचायत 2 व आर्मिच्या 6 यांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सद्या सांगलीवाडी परिसरात जवळपास 3 हजार अन्न पाकिटे हेलिकॉप्टर व बोटीव्दारे पोहोचविण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त शहरासाठी जवळपास 5 हजार अन्न पाकीटे व पाण्याच्या बॉटल्स बोटीव्दारे वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचविण्यात येत आहेत. पाणीपातळी 57.4 फूट असून स्थिर होत असून कमीही होत आहे. तरी जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे कोणीही घाबरून जावू नये. जिल्हा प्रशासनातर्फे पूरस्थिती हाताळण्याचे सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत.
आपत्कालीन स्थितीत मदत हवी असल्यास पुढीलक्रमांकावर संपर्क करा - 9370333932, 8208689681.

टिप्पणी पोस्ट करा