(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पूरग्रस्तांचे मदत कार्य सुरळीत होण्यासाठी 24 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात बंदीची अधिसूचना | मराठी १ नंबर बातम्या

पूरग्रस्तांचे मदत कार्य सुरळीत होण्यासाठी 24 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात बंदीची अधिसूचना

कोल्हापूर ( १२ ऑगस्ट २०१९) गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतीवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराची परिस्थिती व त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पूरगस्तांचे मदतकार्य सुरळीत व्हावे त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये तसेच 12 ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांचा साजरा होणारा बकरी ईद सण, स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम सुरळीत पार पाडणे आवश्यक आहे. विविध प्रश्नावर होणारी आंदोलने, आत्मदहन, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन तसेच विविध पक्ष/संघटनांकडून मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलने व दि. 24 ऑगस्ट रोजी साजरा होणारा दहीहंडी सण, यादरम्यान जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी आज प्रसिद्धस दिली आहे.

जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 चे कलम 37(1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये दि. 12 ऑगस्ट सकाळी 7 पासून ते दि. 24 ऑगस्ट 2019 रात्री 24 वाजेपर्यंत हा आदेश जारी करण्यात येत आहे. हा हुकुम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्य व अधिकार बजावण्याच्या संदर्भात वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते ज्या व्यक्तीने पोलिस अधिक्षक कोल्हापूर अगर संबंधित उप विभागीय पोलिस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलिस निरिक्षक किंवा सक्षम पोलिस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना आणि 15 ऑगस्ट 2019 रोजी स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम तसेच पूरग्रस्त भागातील मदत कार्य वगळून व सर्व जाती धर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेत यात्रा यांना लागू पडणार नाही.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget