(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मदत साहित्य वाटपासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती - जिल्हाधिकारी दौलत देसाई | मराठी १ नंबर बातम्या

मदत साहित्य वाटपासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती - जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर, दि.13 (जिमाका) :- पुरामुळे बाधित झालेल्या गावातील लोकांना मदत म्हणून बाहेरच्या जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक साहित्यांची आवक होत आहे. प्राप्त झालेल्या साहित्याचे नियंत्रण,नियोजन व वाटप करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांची आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

नियंत्रक अधिकारी पुणे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 13 चे अजय पवार यांची शिवाजी मोहिते गोडाऊन,वडगाव रोड,अंबप फाटा वाठार येथे नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी संपर्कासाठी 8856801708 हा क्रमांक आहे. तसेच पुणे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 3 चे श्रीमंत पाटोळे यांची प्लॉट नं. 1, हिंद गेअर इंडस्ट्रिज,मयुर फाटा,फोर्ड शोरूम,शिरोली एमआयडीसी येथे नियुक्ती करण्यात आली आहे.येथील संपर्क क्रमांक 9075748361 हा आहे. सहाय्यक अधिकारी म्हणून सातारा जिल्हापरिषदेचे उप मु.का.अ. (पाव स्व) के.एस. सायमोते व सासवडचे ग.वि.अ.पं.स. चे एम.ए. टोणपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अवर कारकून उल्हास कांबळे, मनोज पाटील, राहूल कोळी,राजाराम आरगे, बजरंग मुगडे, बंडगर, विनोद वस्त्रे व चंद्रकांत यादव तसेच लिपीक राहूल पाटील,प्रकाश दावणे,आर.आर.पाटील,विजय कांबळे, शिवाजी इटलावार,माधव इगवे, सचिन कांबळे, बाळासो कागलकर यांची सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी नियंत्रक अधिकाऱ्यांकडे नेमून दिलेल्या गोडावून मध्ये उपस्थित राहून नियंत्रक अधिकाऱ्यांनी सोपविलेले काम करायचे आहे. सोपवलेल्या कर्तव्यात कसून केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईल.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget