(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वीज सेवा पूर्ववत होण्यासाठी आय. टी. आय. च्या विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा | मराठी १ नंबर बातम्या

वीज सेवा पूर्ववत होण्यासाठी आय. टी. आय. च्या विद्यार्थ्यांचा खारीचा वाटा

सांगली ( १३ ऑगस्ट २०१९) : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक ठिकाणची वीज वितरण व्यवस्था कोलमडली होती. ही सेवा पूर्ववत होण्यासाठी महावितरणच्या वतीने युद्ध पातळीवर काम सुरू आहे. त्यांच्या मदतीला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगलीचे शिक्षक आणि विद्यार्थी सरसावले आहेत. आपल्या परीने खारीचा वाटा उचलताना ते दिसत आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे इलेक्ट्रिकल विभागाचे जवळपास 70 विद्यार्थी आणि 7 शिक्षक सांगली आणि सांगलीवाडी परिसरात वीजसेवा पूर्ववत होण्यासाठी महावितरणला मदत करत आहेत. हे विद्यार्थी इलेक्ट्रिशियन आणि वायरमेन विभागाचे दुसऱ्या वर्षाचे आहेत. जिल्हा प्रशासन, महावितरण यांच्या आवाहनानंतर प्राचार्य यतीन पारगावकर यांनी विद्यार्थ्यांना यासाठी प्रेरित केले. त्यानंतर गेले 2 दिवस हे विद्यार्थी विविध ठिकाणी वीजमीटरची तपासणी करत आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget