(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अमरावती येथे विभागीय कामगार उपायुक्त कार्यालयास मान्यता | मराठी १ नंबर बातम्या

अमरावती येथे विभागीय कामगार उपायुक्त कार्यालयास मान्यता

कामगार मंत्री संजय कुटे यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई ( २१ ऑगस्ट २०१९) : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात असलेल्या कामगारांसाठी आता अमरावती येथे विभागीय कामगार उपयुक्त कार्यालय निर्मिती करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून यासाठी कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांनी विशेष परिश्रम घेतले होते. बुधवारी कामगार विभागाने हा शासन निर्णयही जारी केला आहे.

विदर्भातील ११ जिल्ह्यात असलेल्या कामगारांसाठी फक्त नागपूर येथे कामगार उपायुक्त कार्यालय होते. यामुळे अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात असलेल्या कामगारांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. सन २०१३ पासून या विभागातील कामगार संघटनांनी अमरावती येथे कार्यालय सुरु करण्याची सातत्याने मागणी लावून धरली होती.

सध्या अमरावती विभागात एकूण १ लाख १७ हजार ६८६ इतके कारखाने व विविध आस्थापना असून कारखान्यात ६० हजार २८२, वाणिज्य आस्थापनेत ७९ हजार ८२७, असंघटीत क्षेत्रात ४३ लाख ९७ हजार ९०९ कामगार कार्यरत आहे.

कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी सातत्याने पाठपुरावा करून अमरावती येथे कामगार उपायुक्त कार्यालय निर्माण करण्यासाठी विविध विभागांची मंजुरी मिळविली. या कार्यालयात कामगार उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह एकूण १० पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे अमरावती विभागातील माथाडी कामगार, कामगार मंडळे, बांधकाम कामगार व असंघटीत कामगार मंडळ, सुरक्षा मंडळ आणि घरेलू कामगार मंडळ यांच्या योजना योग्य पद्धतीने अंमल करण्यास मदत होणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget