(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पूरबाधितांनी तक्रार अथवा मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा | मराठी १ नंबर बातम्या

पूरबाधितांनी तक्रार अथवा मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा

नियंत्रण कक्ष क्रमांक 9370333932 / 8208689681, टोल फ्री क्रमांक 1077

सांगली ( २० ऑगस्ट २०१९) : सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती ओसरल्यानंतर पूरपश्चात उपाययोजना करण्यासाठी सर्वच यंत्रणा युध्दपातळीवर प्रयत्नशील आहेत. पूर बाधित गावांना, तालुक्यांना मदत व पुनर्वसन अंतर्गत सानुग्रह अनुदान वाटप, धान्य वाटप, पाणीपुरवठा, कृषी, पशुसंवर्धन, पंचनामे इत्यादी बाबत कामे अत्यंत गतीने चालू आहेत. याबरोबरच स्वच्छता, औषध फवारणी, पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा, आवश्यक तेथे टँकरची उपलब्धतता, पूरबाधित गावांमध्ये प्रत्येक गावात आरोग्य पथकांमार्फत औषधोपचार, मृत जनावरांची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट, जनावरांना लसीकरण या सर्व बाबींनाही प्राधान्य देण्यात आले आहे.

या सर्व उपाययोजनांच्या अनुषंगाने नागरिकांना काही शंका, अडचण अथवा तक्रार असल्यास अथवा मदत हवी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्रमांक 9370333932 / 8208689681 तसेच टोल फ्री क्रमांक 1077 यावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget