(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); सांगली जिल्ह्यात 14 हजारहून अधिक विस्थापितांवर 67 वैद्यकीय पथकांद्वारे औषधोपचार | मराठी १ नंबर बातम्या

सांगली जिल्ह्यात 14 हजारहून अधिक विस्थापितांवर 67 वैद्यकीय पथकांद्वारे औषधोपचार

सांगली ( १२ ऑगस्ट २०१९) : ‍जिल्ह्यात पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांना स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. या पूरग्रस्तांवर उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. चार तालुक्यांमध्ये 14 हजार 891 पूरग्रस्त नागरिकांवर औषधोपचार करण्यात येत आहे.

मिरज तालुक्यातील हरिपूर, मौजे डिग्रज, पद्माळे, नांद्रे, समडोळी, सावळवाडी, माळवाडी, दुधगाव, कसबे डिग्रज, तुंग, कवठेपिरान, अंकली, ढवळी, निलजी/बामणी, जुनी धामणी, म्हैसाळ या 16 गावांतील एकूण 1 हजार 30 विस्थापितांवर 16 पथकांद्वारे औषधोपचार करण्यात आले आहेत. पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी, भिलवडी स्टेशन, माळवाडी, खंडोबाचीवाडी, वसगडे, नागठाणे, अंकलखोप, विठ्ठलवाडी, दह्यारी, रामानंदनगर, दुधोंडी, पलूस या 15 गावांतील 6 हजार 484 विस्थापितांवर 17 पथकांद्वारे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र, कासेगाव, नेर्ले, बावची, वाळवा, बागणी, बोरगाव, येलूर, कुरळप या ग्रामीण भागातील एकूण 4 हजार 921 विस्थापितांवर 23 पथकांद्वारे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तसेच इस्लामपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये मसुचीवाडी, शिगाव, वाळवा, बोरगाव, बहे, खरातवाडी, साटपेवाडी, हुबालवाडी, खरातवाडी, बोरगाव, गौडवाडी या गावांतील 1 हजार 288 विस्थापितांवर 6 पथकांद्वारे वैद्यकीय उपचार करण्यात आला आहेत. कसबे बीड, नागठाणे, औदुंबर, दुधगाव, सांगलवाडी, कसबे डिग्रज, अंकलखोप या गावांतील 1 हजार 168 विस्थापितांवर आष्टा नगरपालिका क्षेत्रामध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत. वाळवा तालुक्यातील एकूण 7 हजार 377 विस्थापितांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. शिराळा तालुक्यातील सागाव, पुनवत, मांगले, देववाडी या गावातील विस्थापितांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget