मुंबई ( १ ऑगस्ट २०१९ ) : ख्यातनाम संगीतकार नौशाद अली यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'फिर तेरी कहानी याद आयी - नौशाद स्वर रजनी' या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. शुक्रवारी दिनांक 2 ऑगस्ट 2019 रोजी रात्री 8.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, बोरीवली (प) येथे हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात शैलजा सुब्रमनीअम, सर्वेश मिश्रा, अर्चना गोरे, मंदार आपटे, संजय एडवणकर, अपर्णा नागरकट्टी-उल्लाल, हर्षवर्धन गोरे हे गायक कलाकार नौशादजींनी संगीतबध्द केलेली गीते सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन- अविनाश चंद्रचूड करणार असून ज्येष्ठ निवेदक अंबरिश मिश्र या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
ख्यातनाम संगीतकार नौशाद अली यांचा जन्म 25 डिसेंबर 1919 रोजी लखनऊ येथे झाला. 2019 हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने महाराष्ट्र शासनामार्फत नौशाद अली यांना संगीतमय कार्यक्रमातून स्वरांजली वाहत आहे.
स्वर्गीय नौशाद अली यांना संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी बद्दल भारत सरकारने 1982 यावर्षी 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने तर सन 1992 मध्ये 'पदमभूषण' पुरस्काराने सन्मानित केले आहे. स्वर्गीय नौशाद अली यांनी सर्वप्रथम 1940 मध्ये 'प्रेमनगर' या चित्रपटाला संगीत दिले. परंतु त्यांना खरी ओळख 'रतन' या चित्रपटातील गीत संगीताने मिळाली. नौशादजींनी अंदाज, आन, मदर इंडिया, अनमोल, घडी, बैजु बावरा, अमर, स्टेशन मास्टर, दिवाना, मुगल-ए-आजम अशा अनेक चित्रपटांना दिलेले संगीत विशेष गाजले.

टिप्पणी पोस्ट करा