(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर | मराठी १ नंबर बातम्या

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई ( ३० ऑगस्ट २०१९) : ग्रंथालय संचालनालयामार्फत सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण देऊन जून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

जून 2019 मध्ये राज्यातील 28 जिल्हास्तरीय केंद्रामधून एकूण 1,128 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 767 विद्यार्थी उत्तीर्ण आणि 361 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. सदर परीक्षेच्या निकालाची टक्केवारी 68.00% आहे. राज्यात सर्वाधिक निकाल हिंगोली केंद्राचा 93.75% असून सोलापूर केंद्राचा सर्वांत कमी 29.58% निकाल आहे. तर विभागामध्ये नागपूर विभागाचा सर्वाधिक 82.76% आणि पुणे विभागाचा सर्वांत कमी 58.17% निकाल लागला आहे.

परीक्षेचा निकाल संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 28 ऑगस्ट 2019 पासून अपलोड करण्यात आला असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या केंद्रावर 15 सप्टेंबर 2019 नंतर मिळणार आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची आहे, त्यांनी प्रत्येक विषयास प्रत्येकी दहा रुपये प्रमाणे शुल्क आणि अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे 25 सप्टेंबर 2019 पर्यंत पाठवावेत. वर्ग व्यवस्थापकांनी फेर गुणमोजणीचे विद्यार्थ्यांचे अर्ज आणि चलनाची प्रत ग्रंथालय संचालनालयाकडे 5 ऑक्टोबर 2019 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. यानंतरचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत असे प्र. ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget