(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी पथकर माफीचे स्टिकर्स 30 ऑगस्टपासून उपलब्ध | मराठी १ नंबर बातम्या

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी पथकर माफीचे स्टिकर्स 30 ऑगस्टपासून उपलब्ध

मुंबई ( २८ ऑगस्ट २०१९) : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकर माफी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी देण्यात येणारे स्टिकर्स दि. 30 ऑगस्टपासून उपलब्ध होणार असून गणेशभक्तांनी जवळचे पोलीस ठाणे अथवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन स्टिकर्स घ्यावेत, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

गणेशभक्तांसाठी पथकर माफीच्या निर्णयाबाबत अंमलबजावणी करण्याकरिता शिंदे यांच्या निवासस्थानी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, तसेच सार्वजनिक बांधकाम, पोलीस, वाहतूक, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ही विशेष सवलत गणेशोत्सवासाठी जाताना आणि परतीच्या प्रवासासाठी लागू असणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे पथकरातून सवलतीसाठी स्टिकर्सचा नमुना तयार करण्यात आला असून त्यावर संबंधित वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आदी माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात, वाहतूक पोलीस चौकी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये देण्यात यावी. प्रादेशिक परिवहन अधिकारी समन्वय साधून हे स्टिकर्स उपलब्ध करुन देणार आहेत.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतानाच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता मुंबई-पुणे प्रवासात पुणे ते कोल्हापूर-कागल मार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मुंबई (वाशी), पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग, किणी तासवडे, मुंबई प्रवेशद्वार, खेड-शिवापूर येथील पथकर नाक्यांवर पथकरातून वाहनांना सवलत देण्यात येणार आहे. या काळात पथकर नाक्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अधिकचे मनुष्यबळ, ट्रॅफीक वार्डन, हँड होल्डींग मशिन ठेवण्यात यावे, असे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget