(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची वेतन खाती सन 2003 पासूनच ॲक्सिस बँकेत | मराठी १ नंबर बातम्या

पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची वेतन खाती सन 2003 पासूनच ॲक्सिस बँकेत

मुंबई ( २९ ऑगस्ट २०१९) : मुंबई पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची खाती सन 2003 पासून ॲक्सिस बँकेत (पूर्वीच्या युटीआय) आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 29 ऑगस्ट 2005 रोजी काढलेल्या शासन निर्णय क्र. डीडीओ-1005/प्र.क्र.5/कोषा-प्रशा.-5 नुसार संपूर्ण राज्यातील शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या मासिक देय वेतन व भत्त्यांचे प्रदान बँकेमार्फत करण्याची कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार एकूण 14 राष्ट्रीयकृत बँकां तसेच खासगी बँकांशी शासनाने करार केला होता. या शासन निर्णयानुसार अधिकारी व कर्मचारी यांच्या पसंतीनुसार 14 बँकापैकी कोणत्याही बँकेच्या शाखेत आहरण व संवितरण अधिकाऱ्याने वेतन खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये ॲक्सिस बँकेचा (पूर्वीची यु.टी.आय. बँक) समावेश आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची सुत्रे देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतल्यानंतर त्यात काही बदल झाला असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. तसेच याबाबतच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे पोलीस दलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पोलीस मुख्यालयातील अधिकारी/कर्मचारी आणि मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करण्यासाठी सन 2007 पासून ॲक्सिस बँकेत खाते उघडण्यात आले आहे. तसेच राज्य पोलीस दलातील 83 विविध कार्यालयातील पोलीसांचे वेतन व भत्ते अशा बँकातून अदा करण्यात येते. त्यानुसार पोलीसांची स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 46 कार्यालयांनी, एचडीएफसी बँकेत 19 कार्यालयांनी, ॲक्सिस बँकेत 15 कार्यालयांनी, बँक ऑफ इंडियामध्ये दोन कार्यालयांनी तर महाराष्ट्र बँकेत एका कार्यालयाने वेतन खाते उघडले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारल्यानंतर पोलीसांचे वेतन खाते ॲक्सिस बँकेत खाते उघडण्यात आल्याची तक्रार चुकीची असल्याचे पोलीस विभागाने म्हटले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget