मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे (महाहौसिंग) सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.
‘प्रधानमंत्री आवास योजना- सर्वांसाठी घरे (शहरी)’ ही योजना 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. राज्यात या योजनेला गती देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय डिसेंबर 2018 मध्ये घेण्यात आला.
कंपनी कायद्यानुसार हे महामंडळ (महाहौसिंग) जानेवारी 2019 मध्ये नोंदणीकृत करुन कार्यान्वित करण्यात आले. मुख्यमंत्री हे महामंडळाचे अध्यक्ष असून गृहनिर्माण मंत्री हे अतिरिक्त अध्यक्ष आहेत. महामंडळाच्या सहअध्यक्षपदी डिसेंबर 2018 मध्ये श्री. मिरगणे यांनी नेमणूक करण्यात आली असून काल त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा