(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत दोन दिवसीय ज्ञान विनिमय कार्यशाळा | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत दोन दिवसीय ज्ञान विनिमय कार्यशाळा

मुंबई ( ३ ऑगस्ट २०१९) : डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री एंड इंटरनल ट्रेड (DPIIT), भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी (MSInS), यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ऑगस्ट आणि ६ ऑगस्ट रोजी २ दिवसीय देशस्तरीय ज्ञान विनिमय (नॉलेज एक्सचेंज) कार्यशाळेचे जे. डब्लू मेरियट, सहार आंतराष्ट्रीय विमानतळ येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे मुख्य उदि्ष्ट देशभरातील राज्यांमध्ये स्टार्टअप्स करता क्षमता बांधणी करणे व स्टार्टअप रँकिंग 2019 करता राज्यांचा सहभाग वाढविणे असे असणार आहे.

महाराष्ट्रात सुरु झालेल्या स्टार्टअप्सना अनुकूल व्यावसायिक वातावरण मिळावे आणि सकारात्मक वातावरणामध्ये स्टार्ट अपनी काम करावे यासाठी राज्य शासन पुढाकार घेत आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाने फेब्रुवारी 2018 मध्ये “महाराष्ट्र स्टेट इन्नोव्हेटीव्ह स्टार्टअप पॉलिसी 2018” धोरण जाहीर केले. त्याबरोबरच या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आणि एकूणच स्टार्टअप ईकोसिस्टीम या संकल्पनेच्या अध्ययन आणि विकसनासाठी जुलै 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीची स्थापना केली.

महाराष्ट्र हे एक प्रगतीशील राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, औद्योगिक क्षेत्र किंवा राज्यातील परकीय गुंतवणुकीचे आकडे पाहिल्यास महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे.सन 2000 ते सन 2020 या काळात मुंबई आणि पुणे या दोन महानगरांनी एकत्रितपणे मिळून महाराष्ट्राला स्टार्टअपचे केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावलेली आहे. सध्या, भारतामध्ये एकूण नोंदणी करण्यात आलेल्या 14,565 स्टार्टअप्सपैकी सर्वाधिक स्टार्टअप्सची महाराष्ट्रामध्ये नोंदणी करण्यात आली आहे.

दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, मेघालय, राजस्थान, दमण दीव , दादरा आणि नगर हवेली अशा देशभरातील विविध राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेदरम्यान, उपस्थित अधिकाऱ्यांना महाराष्ट्र स्टार्टअप इकोसिस्टमविषयी व राज्यात राबवल्या जाणाऱ्या उत्कृष्ट योजना व प्रकल्पांबद्दल माहिती देण्यात येणार आहे.याच बरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध इन्क्युबेशन सेन्टर्स SINE-IIT Bombay, RiiDL-K J Somaiya Institute, IIT मुंबई चे Bombay’s healthcare innovation center BETiC Lab इत्यादी यांना भेट व महाराष्ट्रातील आश्वासक स्टार्टअप प्रतिनिधींशी संवाद साधण्यात येणार आहे.

या दोन दिवसीय कार्यशाळेमुळे विविध राज्यांच्या प्रतिनिधींमध्ये कल्पनांची देवाणघेवाण होऊन याचा फायदा महाराष्ट्रातील स्टार्टअप्स च्या व्यावसायिक वातावरणास चालना मिळण्यास होणार आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget