(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण | मराठी १ नंबर बातम्या

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण


मुंबई ( १५ ऑगस्ट २०१९) : देशाच्या स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमीत्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले.
अमृता फडणवीस यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी पोलीस पथकाने ध्वजास सलामी दिली. यावेळी निवासस्थानातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------
भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

विधान भवन येथे आज स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती,रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते, विधानसभेचे अध्यक्ष, हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव यु.के.चव्हाण, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती यांचे सचिव महेंद्र काज, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांचे सचिव राजकुमार सागर, विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव विलास आठवले, जितेंद्र भोळे, मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, राजेश तारवी, नागनाथ थिटे, अवर सचिव सायली कांबळे, सोमनाथ सानप, रवींद्र जगदाळे, रंगनाथ खैरे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.
----------------------

मुंबई उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीनी केले ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानवंदना दिली.
यावेळी न्यायमूर्ती कुरेशी, बी. पी धर्माधिकारी, एस. सी. धर्माधिकारी यांच्यासह वरिष्ठ न्यायाधीश, मुख्य सचिव अजोय मेहता, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, पोलीस आयुक्त संजय बर्वे, अमृता फडणवीस, यांच्या समवेत निवृत्त न्यायाधीश, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
--------------------

स्वातंत्र्य दिनानिमित्त आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शेलार आणि आमदार तृप्ती सावंत यांच्या हस्ते जितेंद्र शर्मा, पूजा पांडे व डॉ.योगेश दुबे यांना सन 2016-17 चे जिल्हा युवा पुरस्कार तर आशुतोष पांडे, अपुर्वा वेल्हाळकर व राधा दळवी यांना 2017-18 चे जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. लघु उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबाबत मे.निल बिव्हरेजेस प्रा.लि. अंधेरी आणि मे.हर्ष प्रेसिअस मेटलन्स प्रा.लि. गोरेगाव या कंपनीच्या उद्योजकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबई उपनगर जिल्ह्यातील राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले. यानंतर शेलार, आमदार तृप्ती सावंत, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस उप आयुक्त मंजुनाथ सिंगे यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापनदिन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात पार पडला. पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी मंत्री खासदार गिरीश बापट, संजयकाका पाटील, संजय काकडे, अमर साबळे, माजी राज्यमंत्री आमदार दिलीप कांबळे, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, कृषी आयुक्त सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे महानगर पालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम , पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे, जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, निवृत्त अधिकारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पोलीस पथकाची मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय अन्य मान्यवर व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या .

राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते वृक्षारोपण

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज सकाळी राजभवन येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, उपसचिव रणजितकुमार, खासदार संजय काकडे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

----------------
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget