मुंबई ( १ ऑगस्ट २०१९ ) : मुंबई शहर येथील वरळी आणि दादर या परिसरात येत्या 7 व 9 ऑगस्ट रोजी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे समन्वय मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती मेळाव्यात राहणार आहे.
राज्यभरात विविध ठिकाणी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. या मेळाव्यांना युवकांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.दिनांक 7 ऑगस्ट 2019 रोजी डोम, एन.एस.सी.आय. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडीयम, लाला लाजपतराय मार्ग, वरळी येथे तर दिनांक 9 ऑगस्ट 2019 रोजी सुर्यवंशी सभागृह, वीर सावरकर मार्ग, दादर पश्चिम येथे हे मेळावे होणार आहेत. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने इच्छुक उमेदवारांची नोंदणी करण्यात येत आहे. दिनांक 6 ऑगस्ट 2019 पर्यंत वरळी साठी तर दिनांक 8 ऑगस्ट 2019 पर्यंत दादरसाठी इच्छुक उमेदवार रोजगार मेळाव्यासाठी नोंदणी करू शकतात.
या मेळाव्यातून हजारो मुला-मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. मुला-मुलींना पदवीनुसार विविध कंपन्यांमध्ये मुलाखतीची संधी दिली जाणार आहे. आयटीआय, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आदी शाखांतील मुलांना नोकरीची संधी मिळणार आहे.
राज्य शासनाचा उद्योग विभाग तसेच सीआयआय या उद्योग संघटनेचा या उपक्रमात प्रमुख सहभाग आहे. स्थानिक विधानसभा सदस्य सदा सरवणकर, सुनिल शिंदे यांच्या पुढाकाराने हे मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा