येथील 600 रहिवाश्यांना त्यांच्या हक्काचे 1BHK घर नुकतेच मिळालेले आहे. तर उर्वरित 400 रहिवाश्यांचे 1BHK घरांचे स्वप्न येत्या 7 ते 8 महिन्यात पूर्ण होणार आहे. एकूण 1 हजार रहिवाश्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला आहे. स्वतः च्या हक्काचे घर मिळाल्याने रहिवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
घाटकोपर येथील कामराज नगरातून परमेश्वर कदम दोन वेळा नगरसेवक पदी निवडून आले आहेत. तर त्यांच्या पत्नी ही याच विभागाच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत.
कदम हे स्वतः कामराज नगरातील रहिवाशी आहेत. सुरुवातीला येथील परप्रांतीय लोकांनी झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न हाताळण्याचे काम केले होते. मात्र येथील मराठी भाषिक रहिवाश्यांना विचारत न घेता झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम केले जात होते. पुर्नवसनाच्या निर्णय प्रक्रियेत मराठी माणसांना हस्तक्षेप करण्यास मज्जाव होता. हे सर्व काही खटकत असल्याने कामराज नगरातील सर्व मराठी भाषिक लोकांना एकत्रित करून त्यांच्या मध्ये जागरूकता आणण्यासाठी येथील काही निवड लोक पुढे आले. त्यात नगरसेवक परमेश्वर कदम हे मुख्य होते.
कामराज नगरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या बनविण्याचे काम झोपडपट्टी दादांकडून केले जात होते. दिवसाला नवनवीन झोपड्या बनत होत्या. या सर्व झोपडी दादांचा नायनाट करीत येथील झोपडपट्टी रहिवाश्यांचे पुनर्वसन करण्यासाठी धडपड सुरू होती.
येथील सर्व रहिवाश्यांना एकत्रित करून त्यांच्या सभा घेत त्यांना पुनर्वसन बाबत समजावण्याचे काम केले जात होते. हे सर्व काही एका रात्रीत घडलेले नाही. गेले 20 वर्ष स्थानिक लोकांसाठी पुनर्वसनाचा लढा सुरू होता. यामध्ये आलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करीत लोकांच्या सहकार्यानेचं आज 1 हजार रहिवाश्यांच्या घराचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. आपल्या लोकांना झोपडपट्टीतून बाहेर काढून त्यांना एका चांगल्या इमारतीत त्यांचे पुनर्वसन करणे, हे एकमेव स्वप्न माझे होते. हे स्वप्न प्रत्यक्षात साकारले गेल्याने फार आनंद झालेला आहे, अशी प्रतिक्रिया परमेश्वर कदम यांनी व्यक्त केली आहे.
खास बाब अशी की, लोकांच्या पुनर्वसनात आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी कामराज नगरातील रहिवाश्यांनी मला महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उभे करून नगरसेवक पदी जिंकून आणले. नगरसेवक पद हाती आल्यावर पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासोबत येथील नागरीक समस्या दूर करण्याचे काम ही करता आले, असे कदम म्हणाले.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, कामराज नगर येथे पाण्याची मोठी समस्या होती. लोक सायकल वरून मानखुर्द पर्यंत पाणी घेऊन येत असे. एखाद्या रस्ताच्याकडेला कुठे पाण्याची पाईपलाईन फुटली असेल तर, अशा खड्ड्यातून पाणी भरले जात होते. येथील लोक दिवस रात्र पाण्यासाठी वणवण करत असे. त्यामुळे येथे बिनधास्तपणे पाणी विक्री होत असे.
पहिल्याच वेळी मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक पदी निवडणूक येताच, जोपर्यंत कामराज नगरातील पाण्याचा प्रश्न सोडविला जात नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. याची दखल मुंबई महापालिका प्रशासनाने घेत येथे मुंबई शहरातून खास पाण्याची पाईपलाईन बसवून दिली. प्रत्यक्षात शहरातून उपनगरात, ते ही उपनगरात टोकावर वसलेल्या कामराज नगराला पाणी देणे अशक्य अशी बाब होती. तरीही प्रशासनाच्या मागे लागून कामराज नगरात शहरातील पाण्याची लाईन टाकून पाण्याची समस्या पूर्णपणे नाहीशी करण्यात यश मिळालेले आहे. आज येथे पाण्याची बिलकूल समस्या नाही. लोकांना पुरेसे पाणी मिळते. पाण्यासाठी वणवण करावी लागत नाही, असे कदम म्हणाले. कामराज नगर सोबत माता रमाबाई आंबेडकर नगर आणि नालंदा नगरातील पाणी समस्ये सोबत अन्य नागरिक समस्या सोडविण्याचे काम ही माझ्या कारकिर्दीत केले असून आज ही माझ्या प्रभागात नागरिक सुविधांचे काम सुरु असल्याचे कदम यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा