(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्रातील तीन तुरुंग अधिकारी – कर्मचाऱ्यांना सेवा पदक | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्रातील तीन तुरुंग अधिकारी – कर्मचाऱ्यांना सेवा पदक

नवी दिल्ली ( १४ ऑगस्ट २०१९) : देशातील 40 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

स्वांतत्र्य दिनानिमित्त आज केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देण्यात येणा-या सुधारात्मक सेवा पदकांस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. तुरूंगसेवेत कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या उपक्रमाबद्दल सेवा पदक प्रदान करण्यात येतात. प्रतिष्ठित सेवेसाठी देशातील तीन तुरुंग अधिका-यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातून सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे सुभेदार शकील शेख यांना हे मानाचे सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले आहे.

याशिवाय, देशातील 37 तुरुंग अधिकारी -कर्मचा-यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील दोघा कर्मचा-यांना समावेश आहे. भायखळा जिल्हा कारागृहाचे शिपाई जितेंद्र काटे आणि कल्याण जिल्हा कारागृहाचे शिपाई अशोक ठाकूर यांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget