(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्राच्या 11 सेना अधिका-यांना शौर्य पुरस्कार | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्राच्या 11 सेना अधिका-यांना शौर्य पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 14 : वायुदल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी आज शौर्य पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्राच्या 11 जणांचा समावेश आहे.

तिन्ही सेना दलाचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज वायुदल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदक मंजूर केले आहेत. या पदकांमध्ये दोन किर्ती चक्र, एक विर चक्र, 14 शौर्य चक्र, 8 बार टू सेना मेडल (शौर्य), 90 सेनापदक(शौर्य), 5 नौसेना पदक(शौर्य), 7 वायुसेना पदक (शौर्य), 5 युध्दसेवा पदक तसेच ऑपरेशन अनंतनागसाठी एका पदकांचा समावेश आहे.

दोघांना ‘शौर्य चक्र’

लष्काराचे अधिकारी कॅप्टन महेश कुमार भुरे आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साबळे यांना शौर्य चक्र जाहीर झाले.

दोन : ‘बार टू सेना मेडल’

मेजर सागर प्रकाश परदेशी यांना ‘बार टू सेना मेडल’ जाहीर झाले आहे. तसेच, मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर ‘बार टू सेना मेडल’ जाहीर झाले आहे.

तिघांना सेना पदक

अतुलनीय शौर्यासाठी मेजर आनंद पठारकर , मेजर वैभव जवलकर आणि कॅप्टन प्रतीक रांजनगावकर यांना सेना पदक जाहीर करण्यात आले आहे.

दोन : वायुसेना पदक

भारतीय वायुसेनेचे अधिकारी ग्रुप कॅप्टन सौमित्र तामसकर आणि स्कॉड्रन लिडर पंकज भुजाळे यांना वायुसेना पदक जाहीर झाले आहे.

एयर कमोडोर सुनिल विधाते यांना ‘युध्दसेवा पदक’ तर तटरक्ष दलाचे इंस्पेक्टर जनरल मनीष पाठक यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘तटरक्षक पदक’ जाहीर झाले आहे.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget