(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); अपसाऊथ मधल्या पर्यावरणपूरक ‘शुद्धी गणेश’ प्रदर्शनाला द्या आवर्जून भेट | मराठी १ नंबर बातम्या

अपसाऊथ मधल्या पर्यावरणपूरक ‘शुद्धी गणेश’ प्रदर्शनाला द्या आवर्जून भेट

पुणे ( २९ ऑगस्ट २०१९) : सगळ्या चांगल्या, नव्या गोष्टींची सुरवात भगवान गणेशाच्या पूजनाने होत असते. जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या पवित्र गोष्टीची सुरुवात करावीशी वाटते तेव्हा आपण सर्वात प्रथम गणपतीचं नमन करतो. नवीन सुरुवात साजरी करण्याच्या उद्देशाने अपसाऊथ आणि ग्रीन गणेश फौंडेशन यांनी संयुक्तपणे अपसाऊथ वाकड येथे “शुद्धी गणेश” या गणेशमूर्तींच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

या मूर्ती पुनर्वापर करता येणाऱ्या जसे की माती, तुरटी, गायीचं शेण, पंचगव्य आणि बिया यांच्यापासून बनविण्यात आल्या आहेत. पवित्र अशा गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर पाण्यात विरघळणाऱ्या या मूर्ती झाडं वाढविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील. या गणेशमूर्तींची किंमत ८०० ते १५०० रुपयांपर्यंत असून वाकडच्या अपसाऊथ मध्ये या शनिवारी होणाऱ्या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

पर्यावरण रक्षण करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तुमच्या स्वतःच्या घराजवळच्या जमिनीत किंवा मातीच्या कुंडीमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करून कशाप्रकारे झाडं वाढविता येऊ शकतात हे या उपक्रमामधून सांगण्याचे ध्येय आहे. रंगीत गणेशमूर्ती बनविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे विसर्जनानंतर पाणी प्रदूषित होण्याचा धोका नाही.

या हरित उपक्रमाबद्दल बोलताना बिलियन स्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रा.ली.चे उपाध्यक्ष कुमार गौरव म्हणाले, “अपसाऊथचा नेहमीच पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाच्या व्यवसायावर भर राहिला आहे. आमच्या सगळ्या उपक्रम आणि कृतींमधून ही गोष्ट अधोरेखित होते. हीच गोष्ट मनात ठेऊन हरित गणेशोत्सव ही संकल्पना पुढे आणण्यासाठी आम्ही या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. जेणेकरून उत्सव साजरा करतानाही आपल्या सर्वांच्या मनात पर्यावरणाविषयीची संवेदनशीलता जागी राहिल.”

ग्रीन गणेश फौंडेशनचे संस्थापक रश्मी आणि शैलेश औसेकर म्हणाले, “गणेशोत्सव हा ११ दिवस साजरा होणारा मोठा उत्सव आहे पण नंतर मोठ्या प्रमाणावर पाणी आणि माती प्रदूषित होते. हे प्रदूषण टाळण्यासाठी आणि उत्सवानंतर झाडं वाढविण्यासाठी पर्यावरण पूरक शुद्धी गणेश मूर्ती वापरता येऊ शकतात.”
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget