ठाणे ( १९ ऑगस्ट २०१९) : माजी न्यामुर्ती बी. जी. कोळसे पाटील ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर सूडबुद्धीने होत असलेल्या भाजपा सरकारच्या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे.
आम्ही महाराष्ट्र बहुजन आघाडी चे सर्व घटक पक्ष असे मानतो की, ही भाजप सारकरची एक प्रकारची दडपशाहीच आहे. आताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी ज्या प्रकारे भाजप सरकारची, त्यांच्या पक्षाची व पक्षाच्या नेत्यांची पोलखोल केली होती. त्याचाच राग मनात धरून हे भाजप सरकार राज ठाकरे ह्यांच्यावर सूड उगवीत आहे. परंतु ह्या भाजपाच्या सुडाच्या राजकारणाला राज ठाकरे भीक घालणार नाही. उलट मागच्या लोकसभा निवडणुकीच्या पेक्षा ही जास्त प्रमाणात विधानसभा निवडणुकीत भाजप सरकारची व त्यांच्या नेत्यांची पोलखोल करतील व येत्या निवडणुकीत भाजप व त्यांच्या मित्र पक्षाना एकतर विरोधी पक्षात तरी बसवतील किंवा घरी तरी पाठवतील. ह्या सर्व सत्कार्यात महाराष्ट्र बहुजन आघाडी चे सर्व घटक पक्ष राज ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, अशी ग्वाही आघाडी चे नेते माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, तानसेन ननावरे, समाधान नावकर, गजानन सिरसाट, विजय घाटे, संजय कोकरे, संजय कांबळे, व भारत जाधव ह्यानी दिली.
तसेच ह्या पुढे महाराष्ट्र बहुजन आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन भाजप सरकारच्या दडपशाही ला जशास तसे संविधानिक मार्गाने उत्तर दिले जाईल, अशी माहिती आघाडीचे राज्य समन्वयक गजानन शिरसाट ह्यानी दिली.
टिप्पणी पोस्ट करा