(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना | मराठी १ नंबर बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना

महाराष्ट्रावरील संकटांचा सामना करण्याची शक्ती दे - मुख्यमंत्र्यांची प्रार्थना

मुंबई ( २ सप्टेंबर २०१९ ) : जगभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ झालेल्या गणेशपर्वानिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराष्ट्रावरील संकटांचा सामना करण्याची शक्ती द्यावी, अशी प्रार्थना त्यांनी श्रीगणेशाचरणी केली.

जगभरातील गणेशभक्तांना गणेशपर्वाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री म्हणाले, गणेशउत्सव हा सर्वांसाठी आनंदाचा पर्व आहे. सर्वांना गणरायाचा आशिर्वाद मिळावा. विशेषत: राज्यातील पूरपीडित बांधवांना त्यांच्या जीवनात समाधान मिळावे, अशीही प्रार्थना त्यांनी केली.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget