(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({ google_ad_client: "ca-pub-2204162319702735", enable_page_level_ads: true }); महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना | मराठी १ नंबर बातम्या

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापना

राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन

नवी दिल्ली ( २ सप्टेंबर २०१९ ) : ढोल-ताशांवरील ठेका आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जय घोषाने आज कोपर्निकस मार्ग व येथे स्थित महाराष्ट्र सदन दुमदुमले. लाडक्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेशभक्तांनी एकच गर्दी केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तीमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले.

महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात सोमवारी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तसेच दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातील विविध गणेश मंडळातही उत्साहाच्या वातावरणात आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितिच्यावतीने आयोजित गणेशोत्सवात महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त श्यामलाल गोयल यांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली. निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांच्यासह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, गणेश भक्त यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास 39 मराठी गणेशोत्सव मंडळातही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सर्वत्र साजरा करण्यात आला.

गणेशोत्सव काळात कार्यक्रमांची रेलचेलदरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांनी या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मराठमोळी लावणी, नाटक, संगीत रजनी, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत मराठींसह अमराठी गणेशभक्तही गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.
Ετικέτες

टिप्पणी पोस्ट करा

[facebook][blogger]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Blogger द्वारे प्रायोजित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget